मी आपणास माझ्या दृष्टीने पाहिलेले व खूप काही प्रमाणात माझ्या अंतःकरणा मधील पुणे सांगत आहे. तरी पण कदाचित माझे आजचे लेखन तुमच्या अणि प्रत्येकांच्या अंतःकरणातील पुणे असेच आहे याची खात्री नक्कीच देईल.
प्रत्यक्षात पुणे बद्दल लिहणं म्हणजे एक जिकरीचे काम आहे. अविस्मरणीय असा ऐतिहासिक अणि सांस्कृतिक वारसा, खऱ्या लोकशाहीचे प्रतिक म्हणजे रयतेचे स्वराज्य, स्त्री शिक्षणाची सुरवात करून स्त्री पुरुष समानतेची शिकवण देशाला देणारे, सामाजीक व राजकीय क्रांतीचे केंद्र, आशा असंख्य घडामोडींची साक्ष पुणे देते. हे सगळ्याना माहीत आहे.
मी पहिल्यांदा कधी पुणे बघितलं, आता माझ्या सारख खूप लोकांनी कदाचित असचं बघितलं असेल. मी मुंबई - पुणे चित्रपट बघितला त्यात खरं तर पुणे बघितलं. परंतू हे अप्रत्यक्ष होत. म्हणुन त्या शहरा बद्द्ल एक कुतूहल निर्माण झाल. व सोबत पुणे पुढील शिक्षणासाठी गाठायचे, अस त्या दिवशी मनात ठरलं. आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबातील असे विधेयके पारित होण्यासाठी कमीत-कमी दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष लागु शकते. तसेच माझ झाल. दोन वर्षां च्या प्रदीर्घ कालावधीनंतर कुतूहलातील पुणे आता वास्तविकते येणार याची खात्री आता झाली.
प्रत्यक्षात आता तो दिवस उजाडला अणि माझे पुण्याकडे प्रस्तान झाले. पुण्यात मला राहण्यासाठी जास्त खटाटोप करण्याची आवश्यकता नव्हती. कारण माझा मित्र,यार, सखा, जास्त अणि भाऊ कमी पुण्यात राहत होता. त्यामुळे राहण्यासाठी त्याची खोली होती . तो आदिवासी विभागात शासकीय सेवक म्हणुन कार्यरत होता, अणि मला पुण्यात अन्यासाठी त्याचे योगदान खूप आहे. याचा बद्दल सांगितल तर विषय सोडून तुम्ही त्याच्या गुणगान करत बसाल अस प्रगल्भ व्यक्तिमहत्त्व आहे. पुण्यात येताच अजून एक ज्याच्या सोबत बालपण गेल,असा धाडशी, प्रमाणिक,कर्तव्यदक्ष,आशा किती तरी उपमा ज्याच्या नावा समोर लागते असा नितिन हा पण तिथेच राहत होता.मला असं वाटल माझ बालपण पुन्हा वापस आल, कारण सगळ बालपण त्या दोघा सोबत गेल होत. येताच बालपणातील मित्र वापस देणार शहर ठरलं माझ्यासाठी नाही तर, असंख्य तरुण-तरुणींना त्याचे बालपणीच मित्र वापस दिले असेल. कारण बहुतेक सर्व mpsc च्या अभ्यासासाठी पुणे गाठतात. बालपणीच मित्र भेटल्या नंतर चा दिसणारा आनंद या शहराला कदाचित माहीत असावा. म्हणुन मुद्दाम भेट घडवून आणत असेल अस वाटते. त्यामुळे मी तर त्या दिवशीच या शहराचा ऋणी झालो. मी पाहिलेल्या चित्रपटापेक्षा कित्येक पटीने सुंदर
आहे याची जाणीव पण आता हळू हळू होत होती.
कदाचित पुणे अणि माझ जुनं नातं आहे. अस मला या विश्वसनीय उदाहरणावरून वाटते. मी ज्या खोलीत रहायला आलो ती एकदम लक्ष्मी रोडवर अणि लक्ष्मी रोड चे महत्त्व त्यानाच माहीत आहे. ज्यांनी पुण्यातील गणपती महोत्सव पहिला, अफाट असा जनसागर,महाराष्ट्रीयन वाद्यांचे, संस्कृतचे अणि श्रद्धेचे, तसेच पुणेरी परंपराचे अभूतपूर्व दर्शन देणारा, उत्सव म्हणजे गणपती महोत्सव. या उत्सवाची जीवनरेखा म्हणजे आमचा लक्ष्मी रोड. उत्सवाच्या दिवशी जणमंथना मधील प्रत्येक नागरिक मग तो स्त्री असो की पुरुष, नाही तर तरुण, तरुणी,आमच्याकडे एकदम आकसाने पाहिल्या शिवाय राहणार नाही. कारण आमची खोली म्हणजे एकदम गणपती उत्सवाचे थेट प्रक्षेपणच. यावरून मी एकदम पुण्याच्या मध्यभागी राहतो याची खात्री आता तुम्हाला झाली.
मी राहतो तो भाग नारायण पेठ, जुने पुणे म्हणुन ओळखल जाते. म्हणजेच अठरा पेठेला जुने पुण्यासोबत आत्मा देखील म्हटले तर वावगे ठरणार नाही. यावरून अस्सल पुणेरी चा तोरा फक्त माझ्या भाषेमुळे मला मिळणारे नाही याची खंत नेहमीच मला राहणार. आता प्रश्न पडला असेल की अस्सल पुणेरी भाषा कशी असेल. याची मी तुम्हाला तीन उदाहरण देवू शकतो, एक म्हणजे माझ्या पेक्षा वयानी अतिशय लहान परंतु विचाराने अतिशय मोठा. कोणती पण भाषा अवगत करण्याचे जणू तंत्र विकसित केले आहे. असा आमचा मोहनराव, याने कसोशीने ती भाषा शिकली. पण आत्मसात नाही केली. कारण चाय ला चहा म्हणणे नेहमी साठी जमणार नाही. आता दुसर हा म्हणजे घरच्या साठी उमराच फुल अणि आमच्यासाठी सहजपणे मिळणारे अस अफलातून व्यक्तिमहत्त्व अस्सल पुणेरी भाषेचा वारसा जपणार व मुळात पुणेरी असलेला तुषार नेहमी तो भाषेवरून मला टोमणे मारायचा,टोमणे हे प्रत्येक पुणेकरांचा अधिकार आहे अणि वेळ प्रसंगी त्याचा वापर जो करतो तोच खरा पुणेकर. तिसर म्हणजे पुणेरी पाट्या आता या पाट्यावर चे विनोद लहानांपासून ते मोठय़ापर्यंत खसखस कशे पिकवता याचे उत्तम उदाहरण देण झाल तर "येथे कचरा टाकणार्या बाई चा नवरा मरेल" आता यावरून समजलेली पुणेरी भाषा स्वराच्या स्पष्ट उच्चार पासून ते भेदक टोमणे मारणे स्पष्ट करते. अस असल तरी प्रेम, जिव्हाळा आपुलकी, पण तीच भाषा शिकवते.
आता मी ज्या साठी पुण्यात आलो आता ते चक्र चालू होणार होत. त्याआधी माझी ओळख खर तर माझ्या भावामुळे झाली. पण नंतर आमची ही मैत्री घट झाली,त्या क्षणी मी एक यशस्वी झालेल्या मुलाला भेटलो, त्याच्या यशस्वीतेचा गौरव करण्याचा कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा मला त्या मुलाकडे पाहून खूप छान वाटलं अर्थात मी त्याला तेवढा ओळखत नव्हतो, कदाचीत तेव्हा मी त्याला न पाहता, त्यांच यश पहिल ते छान वाटल. पण जशी ओळख झाली तस मग, मला त्यांनी केलेल कष्ट, त्यांची जिद्द, त्यांचा प्रामाणिकपणा हे बघितल त्यां नंतर मला त्याच खर यश कळलं. स्वभावाने शांत, पण एकदा मैत्री झाली की,बोलायला न ऐकणारा,संध्याकाळ च हळद दूध पार्टनर, असा सी.ऐ.अक्षय. आता मला, मी पुण्यात फक्त अणि फक्त अभ्यासासाठीच आलो याची नेहमी पूर्व कल्पना देणारा, अतिशय व्यवहारिक,जर तर प्रश्न विचारुन, वास्तविकता अणि भविष्यातील गोष्टीची सांगड घातली पाहिजे असे सांगणारा अजिंक्य पण या पुण्यानिची दिला.अशा मध्ये अजून दोघांची भर पडते. तशी आमची जुनी ओळख पण खरा उजाळा त्या ओळखीला पुण्यात भेटला. आपल्या विदर्भातील बोलणं कसं असलं पाहिजे हे आपल्या वाणीने स्पष्ट करणारे आपल्या गावातील असंख्य लोकांचे विनोदी किस्से पुन्हा पुन्हा सांगून सतत हसवणारा दिलखुलास असा आकाश मला पुण्यात भेटला. आणि दूसरा म्हणजे, अतिशय शांत फक्त दिसला, अवघड भाषेत पारंगत म्हणजे इंग्रजीत, एक मार्गदर्शक,विनोदाचा बादशहा, हॉलिवूड सिनेमा चा चाहता ते पण इंग्लिश सब टायटल मध्ये,प्रशांत भाऊ पुण्यात भेटले.
असेच एक रविवारी मी अणि आपल्या शांत स्वभावाचे स्मित हास्य नेहमीच चेहर्यावर ठेवणारा, दिलेले वचनास कटिबद्ध असलेले, सोलापुरी भाषेतील काय बे चे लक्षवेधी उच्चारण करणारा दीपक सोबत घेतलेली गुड लक चौकातील इराणी कॅफेतील कॉफी आज पण पुण्यातील रविवार ला उजाळा देते. नक्की कसा असतो मग रविवार, Fc रोडची मनाला भुरळ पाडणारी गर्दी, खाऊ गल्लीतील खवय्येनी काढलेले फुरसत, मनाचा रुसवा,फुगवा, धूर करण्यासाठी आलेल्या नारीच्या ताफ्याने गजबजलेली तुळशी बाग, स्वयंपाकाचा कंटाळा, लहान मुलांचा हट्ट, आपल्या प्रेमाचा आलेख उंचावण्यासाठी लीन असलेले प्रेमी, या सगळ्याची वर्दळ असलेली सारस बाग,असा असतो पुण्यातील रविवार.या गर्दी बरोबर दर दिवशी च्या गर्दीमधून वाट काढत हिंजवडी च्या आयटी पार्क मध्ये जाऊन आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचताच मोकळा श्वास घेणारा प्रत्येक इसम, प्रत्येक दिवसांची संध्याकाळ आपल्या एकमेकाच्या अंतःकरणात एकमेकांनी सांगितलेल्या गुप्त गोष्टी साठवून ठेवणारा झेड ब्रिझ, अणि याच ब्रिज वर येथली झुंबड न ओसरणारी.
पुण्याच्या हिरवळीत भर घालणारे, अबाला पासून वृद्धापर्यंत आरोग्या ची काळजी घेण्याची सवय लावणारे,
एकांतवासात निसर्ग चे सौंदर्य दाखवुन , हिरव्या पुण्या ची खरी ओळख करून देणारी तळजाई टेकडी. आणि या टेकडीची मला खरी ओळख करून देणारा, कोल्हापुरी बाणा जपणारा, आपल्या कोल्हापुरी बोलीतून चांगल्या चांगल्या ना गारद करणारा, सतत सगळ्याच्या चेहर्यावरील भाव हास्यात परावर्तीत करणारा,गुप्त माहीती सूत्रांनकडून मिळवून प्रत्येकाचे समाधान करणारा, वैभवनी करून दिली.
महाराष्ट्र केसरीचा गदा घेणार्याच्या पायात बळ देणारी,पोलिस व सैनिकभरतीसाठी प्रेरणा, क्षणभरात चांगल्या चांगल्या चा घाम काढणारी पर्वती,
शहराच्या एकदम मधोमध, पुण्या च्या हिरवळीत आणि सौंदर्यात भर घालणारे, विदेशी पर्यटकांचे आकर्षण, निरोगी जीवनास मदत करणारी, हनुमान आणि वेताळ टेकडी,
शौर्य आणि पराक्रमाचे ग्वाही, रयतेच्या स्वराज्याची निशाणी
उभारण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्यांना निष्ठावंत मावळयाची साक्ष देणारा, सिंहगड.
क्षितिज समांतर पसरलेला, आपल्या घोटांनी मनुष्या पासून पशू-पक्ष्यांना तृप्त करणारा, असंख्य लोकांना आपल्या कोंबलेल्या जीवनातून मोकळा श्वास देणारे, खडकवासला धरण
पुण्यातील प्रत्येक ठिकाण काहीना काही सांगुन जाते याची प्रचिती प्रत्येकाला आली असेल.
अशा लक्षणीय ठिकाणांच ऐकत्रिकरण करून माझ्या अणि तुमच्या दृष्टीत लपलेले पुणे स्पष्ट होते.....
- अविनाश वाघमारे
Kamaaal.... Bahhaaarr .!!
उत्तर द्याहटवाप्रगल्भ स्मरणशक्तीचा आविष्कार
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवा👌👌👌👌
Khup Chan
उत्तर द्याहटवाखुप माहिती पूर्ण लेख, खूपच छान अवि👌👌👌👌👌👍👍👍
उत्तर द्याहटवासर्जनशील लेखक.......
उत्तर द्याहटवाKhupach chan sir srv Athvlya sarkh zal
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा