माझ्या निरीक्षणातून आणि स्वअनूभवातून मी काही गोष्टी चे निरीक्षण केले. त्यातून मला आत्मविश्वास वाढतो असा अनुभव आला. तुम्ही पण नक्की करून बघा नक्कीच तुमचा पण आत्मविश्वास वाढेल. आपण नसले ते कारभार करत बसतो एकदा मी सांगतो ते पण तसचं करून बघा. 

'आत्मविश्वास' या शब्दातच यशाचे गुपित दडलेले असते. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करू शकता? अस म्हणायचे कारण की, हे खूप लोकांनी करून दाखवले. म्हणजे तुमच्या स्व-विश्वासावर आत्मविश्वास हा शब्द बनला आहे हे आधी लक्ष्यात येते आणि तेच महत्त्वाचे ठरते. आता आपण आपला आत्मविश्वास वाढेल अश्या काही साद्या गोष्टी बघू. 


1)तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा म्हणजे आवश्यक त्या गोष्टीचा तणाव घ्या नको त्या गोष्टी चा तणाव घेवू नका.

सतत हसत रहा. तुम्हाला कितीही तणाव असला तरी ते चेहऱ्यावर दिसू देऊ नका. लोकांशी प्रेमाने बोला व वागा. अपयश आलं तरी त्याचा त्रास करून घेऊ नका. कारण तणावा मुळे तुमचा आत्मविश्वास कमी होत असतो. हा अनुभव तुम्हाला पण आला असेल. 


2) पेहरावाकडे लक्ष द्या: हा सर्वात महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करता. त्याचा तुमच्या आत्मविश्वासावर परिणाम होत असतो. चांगले दिसण्याने तुम्ही लोकांना आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता. कारण चार-चौघात आपण कसे दिसतो? अशा शंकांमुळे न्यूनगंड निर्माण होत असतो. याचा पण तुम्हाला अनुभव आला असेल. म्हणून पेहरावाकडे लक्ष द्या.


3) यशस्वी लोकांकडे लक्ष द्या : तुमच्या आसपास अशी काही लोक असतात. ज्यांना पाहून तुम्हाला वाटते ती व्यक्ती आत्मविश्वासाने पूर्ण आहे. अशा लोकांकडे लक्ष्य द्या आणि ती करत असलेल्या गोष्टी तुमच्या दैनंदिन आयुष्यात फॉलो करा. 


4) प्रयत्न करा : एखादी गोष्ट जमत नसेल तर तिला सोडून देऊ नका. ती पूर्ण करण्यासाठी निदान प्रयत्न तरी करा. कारण प्रयत्न केल्यावरही अपयश आलं तरी त्यातून मिळालेला अनुभव तुम्हाला खूप शिकवून जातो. म्हणून प्रयत्न करणं कधीही सोडू नका.


5) तुलना नको : स्वतःची दुसऱ्या व्यक्तीबरोबर कधीच तुलना करूच नका. कारण समोरचा कसा आहे? हे फक्त समोरून दिसत असते. त्याच्याबाबत पूर्ण सत्य आपल्याला माहिती नसते. म्हणून त्याच्याशी तुलना करू नका.


6) मान्य करा: बदल करण्यासाठी व आत्मविश्वास वाढण्यासाठी कोणतीही गोष्ट मान्य करायला पाहिजे. जसे कि, एखादी गोष्ट तुम्हाला येत नसेल तर तुम्ही ती मान्य करा उगाच मिरवत बसू नका. 


7) बिनधास्त बोला : तुम्ही जर दबलेल्या आवाजात बोलत असाल. तर ते आजच बंद करा. कारण यामुळे आपण आपला आत्मविश्वास गमावून बसतो. म्हणून बिनधास्त बोला.


8) स्वत:ची स्तुती करा: दररोज सकाळी आरशासमोर उभे राहून तुमच्यात असलेले सर्व चांगले गुण आठवा व स्वतःची स्तुती करा. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते.

 

       या गोष्टी जीवनात अनुकरण करा नक्कीच तुमचा आत्मविश्वास वाढेल......

      

                     - अविनाश वाघमारे


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने