कळंत नाही काय? चाललं देशात

असे वाटते जानेवारी, फेब्रुवारी, दोनच महिने होते वर्षात..

मार्च, एप्रिल, मे हे समजण्यात गेले..

कहर कोणाचा? करोना की मिडिया चा

या प्रश्नाचा उलगडा होणार तेवढ्यात

पुन्हा मिडिया बहरली....

पण आता मात्र थोडा बद्दल झाला

करोना ला मागे टाकून राफेल आला

राफेल संरक्षणाच योग्य पाऊल

पण सादरीकरणात गदर मधील सनी देओल चा भाऊ..

हे संपत नाही तेव्हढ्यात पुन्हा मिडीयात ट्विस्ट आला

अमिताभ बच्चन चा रीपोर्ट करोना पाॅझिटिव्ह झाला

तेव्हा समजले की 121 कोटी भारतीयांन पैकी

जणू काय एकालाच करोनाची लागण झाली....

ते संपत नाही तर पुन्हा मीडियाचा डोळा सुशांत केस वर गेला

त्यासाठी चालवली मुंबई vs बिहार पोलीस मालिका

त्यात काही दिवसांनी सीबीआयनी प्रवेश केला

पण मालिकेला खरी कलाटणी मात्र दिली ती रियांनी

आता कितव्या भागात न्याय मिळेल बघा उघड्या डोळ्यांनी..

या सगळया खेळात विसर पडला

भारत विकसनशील राष्ट्र असल्याचा 

या आठवणीसाठी एक वादळ आलं

पण या वादळात धूळ, माती कण, दगड नव्हते

होती ती बेरोजगारी, उपासमारी, दारिद्र्यी

मग तज्ञांनी मोजला वादळाचा वेग

वेग होता - 23.9, वेग होता - 23.9.........



                           -अविनाश वाघमारे 

5 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने