आपल्या आयुष्यात काही तरी ध्येय असल पाहिजे, नुसता ध्येय असून चालत नाही त्याला पूर्ण करता पण आल पाहिजे. आपण नेहमी ध्येय निश्चित करतो पण ते गाठत असताना, आपल्याला आलेल्या अडचणीत गोंधळून जातो आणी ध्येय कडे दुर्लक्षित करतो. या साठी मी तुम्हाला मार्मिक अशी सत्य घटना सांगतो. 



एक मुलगा मुख्याध्यापिका कडे गेला आणि म्हणाला, "मॅडम, आता मी शाळेत येणार नाही."मुख्याध्यापिका ने विचारले "पण का?"

मुलगा म्हणाला " मी एका शिक्षकाला दुसऱ्या शिक्षकांबद्दल वाईट बोलताना पाहिले ; आपल्याकडे जे शिक्षक आहेत ते चांगल शिकवत नाहीत ; कर्मचारी चांगले नाहीत ; विद्यार्थी त्यांच्या सहकारी विद्यार्थ्यांना त्रास देतात आणि इथे अनेक  चुकीच्या गोष्टी होतात  "मुख्याध्यापिका ने उत्तर दिले "ठीक आहे. पण आपण शाळा सोडण्यापूर्वी, माझ्यासाठी कृपा करून मी सांगतो  ते काम करा: एका काचेच्या प्यालात पाणी घ्या आणि एकही थेंब न सांडता  शाळेभोवती तीन वेळा चक्कर मारा व नंतर, तू तुझी इच्छा असल्यास शाळा सोड "मुलाने विचार केला: हे खूप सोपे काम आहे! प्राचार्यांनी सांगितले म्हणून त्याने शाळेला तीन वेळा चक्कर मारली . जेव्हा  त्याचे तीन राऊंड संपले तेव्हा त्याने मुख्याध्यापिका ला सांगितले .

मुख्याध्यापिका ने विचारले "जेव्हा तुम्ही शाळेला राऊंड मारत  होता, तेव्हा तुम्ही एका शिक्षकाने दुसर्या शिक्षकांबद्दल वाईट बोलत असताना पाहिले का?"

त्या तरुणाने उत्तर दिले, "नाही."

" सिनिअर विद्यार्थी ज्युनिअर  विद्यार्थ्यांशी चुकीच्या पद्धतीने वागताना पाहिले का?"

"नाही"

"शिक्षक शिकवताना पाहिले का?"

"नाही"

तेव्हा मुख्याध्यापिका त्याला म्हणाले की 

"तुझे लक्ष फक्त पाण्याच्या ग्लासावर होते, त्यामुळे  दुसऱ्यांच्या चुकांकडे लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केल्यामुळे  तुझ्या ग्लासातील एकही थेंब न सांडता तू तुझं ध्येय पूर्ण करु शकलास .  

आपल्या आयुष्याचेही असेच आहे .जेव्हा आपण आपले लक्ष्य / ध्येय सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी वेळच नसतो. आणि अर्थात आपली ध्येय पूर्ती होते. या उलट आपण आपल्या ध्येया कडे दुर्लक्षित झालो आणि इतरांच्या चुका कडे लक्ष देत राहिलो. तर आपण आपल्या ध्येया ला मुकु म्हणून इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा व त्यालाच प्राधान्य द्या.....

         

                      - अविनाश वाघमारे 



            


1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने