चारही बाजूंनी लोकांनी गजबजलेले घर,परिचयाची अगरबत्ती आणि अत्तराचा वासाने बधिर पडलेले नाक,शोकांतिका असलेली मुद्रा घेऊन, उभे असणारे गणगोत, कोसो दूर असलेला नातलग येताच, हृदयात साठलेला हुंदकयाचा जोरात फुटणार हंबरडयांनी दणाणून गेलेले घर, कोणी तरी कैलासवासी झाला याची जाणीव करून देते, देहाची संपलेली कार्यक्षमता, निर्जीव पडलेले धड,यालाच साधारणपणे आपण मरण म्हणतो.
                यावर मी तुम्हाला एक मार्मिक गोष्ट सांगतो. एका गावात एक स्त्री राहत होती. खूप वर्ष झाले तिला मूलं बाळ होत नव्हत. असंख्य नवस, उपवास, देवाचे साकडे, लोकांनी सांगितलेले सगळे काही केल्या नंतर शेवटी प्रयत्नांना यश आले. तिला खूप वर्षानंतर एक मुलगा झाला. तो मुलगा तिच्यासाठी जीव की प्राण होता. प्रत्येक बाळ आपल्या आईचा काळजाचा तुकडा असतो. पण या मातेसाठी तीच संपूर्ण काळीज हा बाळ होता. ऊन त्याच्यावर पडली तर सावली बनणार, त्याच्या वाटेचे सगळे दुःख ती स्वतः घेवून त्याला फक्त सुखच देणार. त्याच्या डोळ्यात कचरा गेला तर अश्रूंनी मातेचे डोळे लाल होत असे. यावरून समजले असेलच एकदम त्याला तिने आरशा प्रमाणे जपले. पण आरसा किती दिवस जपला तरी, अनवधानाने एक दिवस फुटतो.


 असाच एक दिवस तिचे बाळ आजारी पडले. आधी - आधी एवढा काही आजारी नव्हता. नंतर - नंतर त्याची प्रकृती ढासाळत गेली. मातेने आपल्या मुलाच्या प्राणासाठी नामवंत वैद्य, देवाचा नवस, बाळाला ठीक करण्यासाठी अत्यावश्यक असलेला, असा कोणताच प्रयत्न सोडला नाही. शेवटी तिच्या प्रयत्नांची पराकाष्ठा निष्फळ ठरली. आणि  लाडक्या बाळाची प्राणज्योत मावळली. साधा जवळच्या व्यक्तिचा मृत्यू आपल मन स्विकार करू शकत नाही. मग हा तर पोटचा गोळा, त्यात पण, खूप दिवसांनी झालेले मुल होत, तिचा पूर्ण प्राण त्या मुलात, अचानक पणे त्याचा झालेले मृत्यूने तिला जबर असा झटका बसला. तिला आता आयुष्य नकोस झालं, आयुष्य ज्या साठी जगाच होत तोच सोडून गेला. मग जगून पण आता काय करायचं, अन्न- पाणी सोडले, दुःखात एकदम लीन झाली, तिचा नवरा, नातलग, शेजारी,सगळ्यांनी तिची समजूत काढली पण ती काही समजाला तयार नाही त्यामुळे सगळे हाताश झाले. कारण तिच्या सोबत झालंच तस होत, यात तिची अवस्था पाहून कोणाच्या पण काळजाला पाझंर नक्कीच फुटेल.
               


        तथागत गौतम बुद्ध त्या गावात आश्रय साठी येतात. वार्‍याच्या वेगाने ते आल्याची बातमी गावात पसरते. मग हीच गोष्ट शेजारणीला माहित होते, तस ती पाहिले त्या मुलाच्या आईला गाठते आणि सांगते की,गावात एक साधू आला आहे. खूप तपस्या करून त्यांनी मृत्यू वर विजय मिळवला आहे अशी लोकांची चर्चा चालत होती. तो तुझ्या मुलाला पुन्हा जीवंत करू शकते. जा तिथे आणि सगळे सांग कस झाल ते. ती माता क्षणाचा विलंब न लावता, मनात एक आनंदाची आस कायम ठेवून, बुध्दां जवळ आली. येताच, तुम्ही काही पण करा आणि माझ्या मयत मुलाला जीवंत करा, अस म्हणून एकदम सगळं शरीर बुद्धांच्या पाया जवळ आदळून साठलेल्या दुःखा चे झरे वाहून मोकळे करते. बुद्ध एकदम शांतपणे, तिचे दुःख बघून,तिची झालेली अवस्था बघुन, ठीक आहे मी तुझ्या मुलाला जीवंत करतो. पण त्यासाठी माझी एक अट आहे. ती एकदम आनंदात सांगा, "मी काही पण कराला तयार आहे." मग अतिशय नम्रपणे बुद्धांनी अट सांगितली की, तू जा, ज्या घरी कोणीचं मरण नाही पावले, त्या घरून थोडे तांदूळ घेवून ये, ते आणले की मी तुझ्या मुलाला जीवंत केले म्हणुन समजं. माता एकदम तत्परतेने,आनंदात आपल मुल आपल्या भेटणार अशी मनोकामना घेवून, प्रत्येक घरी जाऊन विचारायची की, तुमच्या घरी कोणी वारले आहे का? उत्तर यायचे कोणाचे काका, कोणाचे आजोबा,कोणाचा मुलगा, कोणाची मुलगी, म्हणजे कोणीना कोणी वारले असायचे, अस करुन अर्ध गाव पालथे, घातले. पण तरी मायेची ममतेने ती आंधळी झाली होती. तिला वाटत होत की, अस एक तरी घर मिळेल. ज्या घरी कोणी मेलेले नसेल. शेवटी तिला पुर्ण गाव आपल्या पायाखालून उलटल्यावर समजले की, अस कोणतच घर अस्तित्वात नाही. मग एकदम हताश होवून आपण ज्या दुःखात आहो त्या दुःखातुन कोणीच सुटल नाही. मग आपण किती स्वार्थी झालो हे तिला समजले. मरण हे अटळ आहे, कोणी लवकर, कोणी उशीरा, पण मरणार हे निश्चित आहे. ती बुध्दाकडे आली. आणि आता तिच्यात बदल झाला.
ती म्हटली खरं मी मायेच्या ममतेने आंधळी झाली होती. खरच मला माझा मुलगा गेल्याच दुःख होते. मला वाटल माझ्या वाटेला हे आल. पण प्रत्येकाच्या वाटेला आहेच. मी स्वतः अभागी समजत होतो. पण माझ्यासारख्या खूप अभागी आहे हे मला आज कळले. बुध्दांनी सांगितले मरण हे निश्चितच दुःख, क्लेश, देवून जाते. परंतु या या दुःखात संपूर्ण जीवन व्यथित करण व्यर्थच आहे. म्हणुन मनाला स्मरण आणि विस्मरण या दोन बाजू आहेत, चांगला गोष्टीच स्मरण आणि दुःख, क्लेश देणार्‍या गोष्टी चे विस्मरण यातच जीवनाचा सार दडलेला आहे.
   
    हे झाल मरण, पण मग नक्की मरण काय, तर खर मरण म्हणजे माणूस नुसता देहांनी मरतो असे नाही, त्यासोबत आपला क्रोध, लोभ, अहंकार, गर्व, या सगळ्या गोष्टी त्यांच्या सोबत मातीत मिसळतात. हे त्याला माहीत असून पण तो या गोष्टीचे आयुष्यभर काटेकोर पणे पालन करतो. या सगळ्या गोष्टीमुळे तो किती तरी लोकांचे मन दुखावतो. कित्येक नाती आपल्या अहंकार तुडवतो,सगळे जीवन ज्या पैश्याच्या लोभा मागे गेले. तो पैसा सुद्धा आपला नाही. मग काय आहे त्याच, फक्त आणि फक्त त्याचा स्वतः चा देह, आणि याच देहाची काळजी तो घेत नाही. म्हणुन शेवटी हाच देह, वेळेआधी आपली साथ सोडतो. खूप लोक म्हणतात माणूस मेला की, त्याच्यासोबत सगळच गेल. पण काय जाते, ते मी सांगितल. आता काय नाही जात ते सांगतो. आयुष्यभर जपलेली नाती, दाखवलेले नम्रता, केलेली मदत,जपलेला जिव्हाळा, नि स्वार्थ केलेले प्रेम, जोडलेले आपुलकीची माणसे, समाजाबद्दल असलेली निष्ठा, या सर्व गोष्टी तो माणूस अजून पण जीवंत आहे याची जाणीव करून देते. यालाच मी खर मरण समजतो, कारण चांगल्या गोष्टीचे स्मरण आणि वाईट गोष्टीचे विस्मरण यात जीवनाचा सार आहे. मरण हे अटळ आहे, त्यात मी,तुम्ही, किंवा कोणीच सुटेल नाही. आणि मरण थांबवणे आपल्या हातात नाही. पण मेल्यानंतर ही लोकांच्या मनात आपल अस्तित्व जीवंत ठेवणे. हे नक्कीच आपल्या हातात आहे. मग तुम्ही ठरवा आता, फक्त मरणार की, मरुण पण आपले अस्तित्व जीवंत ठेवणार.


              " सूर्यास्त होण्यापूर्वीच उद्या होणार्‍या सूर्योदयाचे
               महत्त्व आपण जाणले पाहिजे."

                     - अविनाश वाघमारे
     

13 टिप्पण्या

  1. अविनाश सर मानवी जीवन मनल कि मृत्यू हा एक दिवस अटळ असतोच..
    पण तुम्ही खुप छान व स्पष्ट शब्दात व्यक्त केले आहे. .

    खुप छान ......

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने