चोर हा शब्द तुम्ही वर्तमानपत्र, प्रसारमाध्यमे, यामध्ये वाचला असेल, ऐकला असेल ,आणि पहिला सुद्धा असेल. चोर हा शब्द उच्चारला की, आपल्या डोळ्यासमोर पैसा,डाका, फसवणूक, लूटमार, घरफोडी, अश्या असंख्य घडलेल्या घटना समोर येते. कधी-कधी न्यूज वाहिनी केलेले चोराचे हुबेहुब वर्णन डोळ्यासमोर येते. ही आपल्या भपकेबाज न्यूज वाहिनी ची कमाल आहे. हा चोराचा संकुचित अर्थ आहे अस मला वाटते. व्यापक अर्थानी पहिली तर प्रत्येक व्यक्ति चोर आहे. त्यातून मी पण नाही सुटलो. त्यासाठी आधी मी तुम्हाला काही वाचलेली उदाहरणे देतो. त्यानंतर प्रत्येक व्यक्ति चोर कसा ठरतो हे  स्पष्ट  होईल. 
                      उदाहरण क्रमांक 1 - 
अमेरीकेमध्ये ‘आर्थर बेरी’ नावाचा दागिने चोरी करण्याच्या कलेत पारंगत असलेला, आणि चोरीचं असामान्य अशी लकब लाभलेला चोर होऊन गेला. अमेरीकेच्या गुन्हेगारी इतिहासात त्य आजही त्याच नाव प्रथम क्रमांकावर येते. इतका तो चोरीच्या दुनियेतील निपुण चोर होता. साधारणता एकोणीसशे वीसच्या दशकात लोकांनी त्याला ‘ग्रेटेस्ट ज्वेल थीफ’ अशी उपाधी देऊन एक प्रकारे त्याचा गौरवच केला होता. तो फक्त अतिश्रीमंत लोकांनाच लक्ष्य करायचा, आणि त्याने चोरी करणं, हे सुद्धा एक प्रतिष्ठेचचं लक्षण होवुन बसलं होतं.चोरी करणं वाईट असलं तरी लोकांमध्ये ह्या चोराबद्द्ल आकर्षण, कौतुक आणि सहानभुती होती. दुर्दैवाने एक दिवशी दरोडा टाकताना, पोलीसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या, आणि त्याला पकडला! वयाची पुढची अठरा वर्षे त्याने कारागृहात काढली. कारागृहातून बाहेर आल्यावर त्याने गुन्हे करणं, चोर्‍या करणं सोडुन साध जीवन जगण्याचा मार्ग स्वीकारला, पण ‘द ग्रेट ज्वेल थीफ आर्थर बेरी’ बद्द्ल लोकांचं कुतुहुल अद्यापही कमी झालं नव्हतं.लोकांनी बदललेल्या आर्थर बेरीची एक सार्वजनिक मुलाखत घेतली, ती ऐकायला मोठा जमाव जमला होता, अनेक प्रश्न विचारले, आर्थरनेही दिलखुलास उत्तरे दिली.मुलाखत खुप रंगली, मुलाखतकाराने शेवटचा प्रश्न विचारला, “तुम्ही सर्वात मोठी चोरी कोणत्या माणसाकडे केली?, खरं खरं उत्तर द्या.”
“तुम्हाला खरचं, खरं खरं उत्तर ऐकायचं आहे का?” गर्दीकडे पाहुन आर्थरने विचारले.“हो, हो!”असा एकच आवाज तिथे येत होता."मी सर्वात मोठी ज्या माणसाकडे केली, त्या माणसाचे नाव आहे, ‘आर्थर बेरी’, हो! मीच माझा सर्वात मोठा गुन्हेगार आहे.” हे ऐकून सगळे एकदम अवाक आणि शांत झाले. त्याच बोलणं लक्ष्म देवून ऐकू लागले. “मी एक सफल व्यापारी होऊ शकलो असतो, मी वॉल स्ट्रीटचा अनाभिषिक्त सम्राट होवु शकलो असतो, मी समाजाची सेवा करणारा एक नशीबवान समाजसेवक बनु शकलो असतो, पण हे न करता मी चोरी करण्याचा मार्ग निवडला, आणि माझं दोन तृतीयांश जीवन मी जेलमध्ये वाया घालवलं.”आर्थर बेरी खरं बोलला होता, त्याचा सर्वात मोठा गुन्हेगार तोच होता.
                             उदाहरण 2–
१८८७ चा एक पावसाळा, एका किराणा दुकाना मध्ये भिजत भिजत एक ग्राहक आत शिरला. त्याने काही वस्तु खरेदी केल्या, आणि काऊंटरवर वीस डॉलर्सची नोट दिली आणि तो बाहेर पडला. गल्ल्यावर असलेल्या स्त्रीने रोजचा ओळखीचा व्यक्ति पाहून स्मितहास्य केले, आणि नोट गल्ल्ल्यात टाकली, तो त्यांचा नेहमीचा ग्राहक होता, दुकानाजवळच त्याचे घर होते आणि पेशाने तो एक होतकरु चित्रकार होता. एमानुअल निंगर त्याचं नाव!नोटा ओल्या असल्याने तिच्या हाताला शाई लागली, तिने बारकाईने नोट पाहिली, ती हुबेहुब नोट होती, पण शाई सुटल्याने तिला बनावट नोट असल्याचा संशय आला,शहानिशा करण्यासाठी, तिने पोलिसांना बोलावले. ती एक बनावट नोट होती, पण इतकी हुबेहुब नक्कल पाहुन पोलिस आश्चर्यचकीत झाले.पोलिसांनी चित्रकाराच्या घरावर छापा मारला, त्याचे सर्व चित्रे जप्त केल्या गेले. त्याला (निंगर ला) जेलमध्ये नेले. आतापर्यंत अनेक बनावट नोटा रंगवुन बाजारात वापरल्याचे त्याने कोर्टासमोर मान्य केले. कोर्टाने त्याच्या चित्रांचा लिलाव करुन नुकसानभरपाईचे आदेश दिले.तो जेलमध्ये असतानाच त्याच्या चित्रांचा लिलाव झाला, त्याचे प्रत्येक चित्र पाच हजार डॉलरहुन अधिक किमतीला विकले गेले. लाखो डॉलर्स जमा झाले. महत्वाची गोष्ट ही होती की पाच हजार डॉलर्सचे चित्र बनवणार्‍या निंगरला त्यापेक्षा जास्त वेळ, वीस डॉलर्सची नोट बनवायला लागायचा. त्याने सर्वात मोठी चोरी स्वतःसोबतच केली होती. प्रामाणिक आयुष्य जगुन तो कितीतरी आलिशान आयुष्य जगु शकला असता. इतरांना न फसवता, त्याने आपल्या कलेला जोपासले असते तर, तो फक्त श्रीमंतच झाला नसता तर, त्याबदल्यात समाजाने, त्याला आदर, सन्मान, मानमरातब आणि ओळख दिली असती, त्या च्या कलेला प्रेम मिळाले असते,सोबत त्याला आनंद, समाधान मिळाले असते.पण त्याने स्वतःला फसवले. स्वतः बरोबर स्वतः च्या आयुष्यातली सर्वात मोठी चोरी केली. 
   
उदाहरण क्रमांक 3– 
                                 हे सगळ्यांना लागु होणार होणार आहे. आपली अंगभुत कला न ओळखणारा, कधी आळशीपणामुळे आणि कधी स्वतःची खरी ओळख न पटल्यामुळे, आपल्या अंगातलं कौशल्य, उपजत गुण न ओळखु शकणारा प्रत्येक जण महा चोर आहे. तो प्रत्येक व्यक्ती चोर आहे, जो आपल्या पुर्णपणे क्षमतेचा वापर करत नाही. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवत नाही. तो व्यक्ती चोरच आहे, ज्याला, आपल्या स्वतःवर विश्वास नाही. तो प्रत्येक रिकामटेकडा व्यक्ती चोर आहे, जो समाजाला काहीही देत नाही, फक्त दुसर्‍यांचे दोष आणि उणीवा काढतो. ही चोरी, कोणी मुद्दाम करतयं, किंवा कोणी नकळत, पण आपल्या कामावर प्रेम न करणारा, कामाला न्याय न देणारा प्रत्येक जण चोर आहे. स्वतः सोबत आणि इतरांबरोबर प्रामाणिक न राहणारा प्रत्येक व्यक्ति चोर आहे. आपल्या आजुबाजुच्यांवर आणि स्वतःच्या आयुष्यावर प्रेम न करणारा प्रत्येकजण गुन्हेगार आहे, आणि वरील दोन चोरांच्या आत्मकथनानुसार,  सगळ्यात आधी तो, स्वतःचाच गुन्हेगार आहे. मग समाजाचा, या गोष्टी न कळत आपल्या आयुष्यात घडल्या असेलच, कोणाला कळाले पण असेल आणि कुणी ते आपल्या अंगवळणी पण पाडले असेल. गुन्हा करणारा चोर हा प्रत्येकांनी पहिला पण माझ्यात तुमच्यात ही एक चोर दडलेला आहे. त्याला बाहेर कडा अणि ह्या चोरांच्या यादीतुन आपलं नाव वगळण्याचा प्रयत्न करा, आणि एक खरा, सच्चा, प्रामाणिक, नागरीक बना.......



                       - अविनाश वाघमारे 

                   
           

4 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने