आजचा लेख लिहण्याचे कारण असे की, वर्तमान पत्रात लेख वाचत होतो. त्या लेखामधे मी वाचले की, महाराष्ट्र मध्ये नाही तर भारतात पण कौटुंबिक हिंसाचार घटनेत खूप वाढ झाले. विशेष म्हणजे त्यामुळे  घटस्फोटचे  प्रमाण वाढले. तो लेख वाचत असताना मला खूप दिवसांपूर्वी वाचलेले सत्य घटना आठवली. ती आधी सांगतो.
         

      ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागतो. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात. आणि त्या सहसा पोकळी असतता. तर, ही भिंत तोडताना त्या माणसाच्या असं लक्षात आलं की आतमध्ये एक पाल अडकून पडली आहे आणि भिंत बनवताना मारलेल्या एका खिळ्यात तिचा एक पाय अडकला होता.त्याला त्या पालीची अवस्था पाहून खूप दया आली आणि त्याचं कुतुहलही जागृत झालं, की हा खिळा जवळपास ५ वर्षां पूर्वी हे घर नवीन बांधलं तेंव्हा ठोकला गेला होता. मग ५ वर्ष पाय अडकलेल्या अवस्थेत ही पाल जिवंत कशी राहिली असेल? असं काय घडलं होतं की, त्या अंधार असलेल्या पोकळीत हालचाल न करता ती पाल जिवंत कशी रहिली?
जे जवळ जवळ अशक्य होतं. त्यानं त्याचं काम अक्षरशः थांबवलच आणि तो त्य पालीवर लक्ष ठेवून बसला, की ती आता कशी,काय खाते? काही वेळाने पाहता पाहता त्याला दीसले की तेथे दुसरी पालही आली आहे आणि तिच्या तोंडात अन्न आहे आणि ती हळूहळू त्या अडकलेल्या पालीला ते अन्न भरवत आहे!!! हे पाहून तो माणूस अवाक झाला, गहिवरला.
कल्पना करा १ नाही, २ नाही तर ५ वर्ष न कंटाळता एक पाल आपल्या जोडीदाराची अशी सेवा करते, अजिबात आशा सोडून न देता ! एक पाली सारखा नगण्य प्राणी आपल्या प्रिय जोडीदाराला सोडुन नजाता त्याची अशा प्रकारे काळजी घेतो, तर आपण माणसं यांपासून काही तरी नक्कीच शिकू शकतो.
तेंव्हा, अडचणीत असलेल्या आपल्या जवळ्च्या प्रिय व्यक्तीला नेहमी आधार द्या जेंव्हा तिला तुमची खरोखरच गरज असते. , कोणतीही गोष्ट (नातं,विश्वास) तुटण्यासाठी एक क्षणाचं दूर्लक्ष पुरेसं असतं, परंतु जोडण्यासाठी अख्खं आयुष्य पणाला लावावं लागतं.....
नाती जपण्यात मजा आहे
बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे
जुळलेले सूर गाण्यात मजा आहे
येताना एकटे असलो तरी
सर्वांचे होऊन जाण्यात मजा आहे
नशीब कोणी दुसरं लिहित नसतं आपल नशीब आपल्याच हाती असतं
येताना काही आणायच नसतं
जाताना काही न्यायचं नसतं
मग हे आयुष्य तरी कोणासाठी जगायचं असतं
याच प्रश्नाचे उत्तर
शोधण्यासाठी जन्माला यायचं असतं...


           अविनाश वाघमारे.......

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने