माणूस जगा लागते म्हणुन जगत आहे. माणसाला मिळाले जीवन माणूस एकदम चिंताग्रस्त, भीती, नैराश्य या मध्ये व्यतीत करून, जीवनाचा अर्थ एकदम बदलून टाकत आहे. "जीवन अनमोल आहे, जीवन एकदाचं मिळते, सुदृढ मन आनंदी जीवनाचे रहस्य आहे." या सगळ्या फक्त कागदावरील संकल्पनांच राहण्याचं कारण, माणसाने मनाकडे केलेले दुर्लक्ष होय. मानवी मन कृत्रिम मनात परिवर्तीत होत आहे. त्यामुळे नैसर्गिक भावनांची जागा कृत्रिम भावना घेत आहे. ज्याची प्रचीती एकमेकांन बद्दल असलेली खोटी स्तुती, हास्य, आनंद, यावरून येत आहे.मानसाचं मन स्वार्थी होत आहे. एकाद्या कडील वैभव, कीर्ती , यश पाहून आपल्याकडे त्याच्यापेक्षा खूप कमी आहे, असं समजून आपण दुःखी होत आहे. तुलना, या अतिशय गंभीर आजाराने माणसाच्या मनाला ग्रासले आहे. आणि यांची सुरुवात खरं तर आपल्या कुटुंबापासून होत आहे. ते अशी की, मुलगा अतिशय लहान असतांना, अगदी प्राथमिक शिक्षण घेत असतांना त्याची तुलना शेजारच्या मुलासोबत किंवा कुटुंबातील त्याच्या पेक्षा मोठा असलेला बंधू किंवा भगिनी यांचा सोबत करतात. त्यात तो त्याच्यापेक्षा किती कमी आहे हे दाखवले जाते. पण त्या बालमनावर काय परिणाम होईल हे आपल मन विचार करत नाही. कदाचित तो आसच ऐकत राहीला तर, एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होवून, तो प्रत्येक बाबतीत स्वतः ला कमी समजेल आणि आहे तसा समजुन स्वतः त्याचा स्विकार करेल. यात त्याची स्वतःला बदलण्याची प्रवृत्ती आपण नष्टा करत अहो, हे आपल्याला कळणार नाही. यावरून असे दिसून येते की, मानवी मन फक्त आणि फक्त नावा पुरतचं संवेदनशील राहील आहे. आपल्या अशाच वागण्याने, तुलनेचा आजार संपूर्ण समाजात पसरला आहे.आज आपण सगळ्यांनी मिळून तुलनेची एक भव्य अशी इमारत उभी केली आहे,आणि प्रत्येक व्यक्ति त्यात कोणत्या मजल्यावर आहे, हे पडताळून पाहत आहे.
खरं तर मानवी मन, माणसाला माणूस, असल्याची जाणीव करून देते, नाही तर आपण आणि पशु एकचं झालो असतो. मी आधीच सांगितल माणूस हा संवेदनशील फक्त नाम मात्र राहिला आहे. मुळात त्याच मन बधीर होत आहे. कारण दैनंदिन जीवनात एवढा व्यस्त झाला की, कारखान्यातील मशीनप्रमाणे त्यांनी स्वतः च जीवन करून टाकले. एखाद्या रोबोट प्रमाणे वागत आहे, रोबोट हा कृत्रिम मानवाचा एक प्रकार आहे, फक्त तो स्वतः विचार करू शकत नाही,त्यामुळे तो प्रेम, राग,हेवा,हातवारे, नयन भाव, इशारे, अश्या असंख्य भावना ओळखू शकत नाही. कदाचित आता समोर असा पण कृत्रिम मानव तयार होईल, यात काही वाद नाही. रोबोट हा एक प्रोग्रामर म्हणुन कार्य करतो. जेवढे आपण त्यात प्रोग्रॅम टाकू तेवढाच तो कार्य करेल. स्वतः हून काही करू शकणार नाही. कारण स्वतः कार्य करण्यासाठी विचार, भावना, मन, या गोष्टी पाहिजे असते, ते सध्या तरी नाही. पण या भावना विचार, प्रेम, मन या गोष्टी असणारा माणूस आपल्यात आहे विसरून, रोबोट मध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि स्वतः रोबोट सारखा वागत होते.
मला या लेखातून मानव जातीला एवढाच संदेश द्यायचा आहे की, नैसर्गिक मनाचं कृत्रिम मनात परिवर्तन नका करू. आपल्या भावना, प्रेम, हास्य, या सगळ्या गोष्टी नैसर्गिकचं चांगल्या वाटतात. नाही तर असा दिवस आपल्यावर येईल आपण बनवलेला रोबोट भावनाशील होईल, आणि बनविणारा मानव भावनाशून्य.
- अविनाश वाघमारे
वा,अवि दा,
उत्तर द्याहटवाअगदी
मन माझे चपळ अंतरबाह्य
सदा निर्मळ,,, संत ज्ञानेश्वर
Tq ram da 🥰
हटवाEkdm brobr Da . . ..
उत्तर द्याहटवामानवी मन असंवेदनशील होत चाललाय।
Tq gana bhawa
हटवामन वढाय वढाय
उत्तर द्याहटवाउभ्या पीकांतलं ढोर,
किती हांकला हांकला
फिरी येतं पिकांवर.
Avi dada 1 numher
Tq sir
हटवाखरं आहे . मानवाने स्वतःच्या भावना जरी जपल्या ना तरी कितीतरी तुटणार मन थांबतील.
उत्तर द्याहटवाTq so much madam
हटवाशेवटी मन , मनातच नाही म्हणतात मनुष्यच मन हे फुलपाखरा सार असत ते एकाठीकानी कधी थांबुच शकत नाही त्याची भावना बदलतील , संवेदना बदलतील ही कदाचित परंतु भवणारहित मनुष्य बबने , विचारच करवत नाही.
उत्तर द्याहटवाTq so much sir
हटवाMast re bhava... Keep inspiring... 🙏👍
उत्तर द्याहटवाTq dada 🥰
हटवाअशी तु खरच मनकवडा आहे
उत्तर द्याहटवाTq so much
हटवाFab bhai
उत्तर द्याहटवाTq bhai
हटवाअप्रीतम
उत्तर द्याहटवाavi सर
तुम्ही अगदी खर मना स्वरुप मांडलय👌👌
Tq sir
हटवाVery well said and true!!!
उत्तर द्याहटवाNice line avi bhau
उत्तर द्याहटवाTq bhau
हटवाExpression is always better than artificial imoression..
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा