यशवंत असो की अपयशी , अपयशाचा अनुभव घेतल्या शिवाय,खरं तर यशाचा जीना चढता येत नाही.म्हणून प्रत्येकाच्या ओळखीचा,कोण्याच्या जास्त तर कोण्याच्या कमी,पण ओळखीचा मात्र नक्कीच,सद्या या शब्दचं थोडं जास्त स्वरूप बदल, त्यामुळे तो जास्त तिक्ष्ण वाटू लागला कारण आता या शब्दाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदला.समाजाकडून बेरोजगार लोकांसाठी वापरलेले खास शब्द अशीं ओळख बनली.                       
         पृथ्वी तलावावर असा कोणत्याही व्यक्ती दाखवा जो अपयशी न होता यशस्वी झाला.कदापिही मिळणार नाही, खरं तर अपयश हें आपल्या रोजच्या जीवनातील एक सर्व साधारण शब्द आहे.त्याची आणि आपली ओळख अगदी लहानपणापासून, ते कसं बघा,आपल्यापैकी कोणी ही असा नाही की ज्यांनी हे अनुभवल नसेल, बाळ एकदम लहान असतो,तो एका- एकीच चालाचं शिकतो का?नाही,आधी तो पोटावर झोपतो,त्यानंतर तो बसा चा प्रयत्न करतो,हे करत असतांनी तो कितीदा तरी पडतो.आधी-आधी तो पडला की रडतो, नंतर पडू पडू तो कणखर होतो.त्यानंतर रडणे बंद करतो.हे सारं झाल्यावर आता कुठं त्याला बसता येतं.असंच अफाट रडून-पडून चालणं शिकतो.त्याच्या वाटेला कित्येकदा अपयश आल्यानंतर तो चालणं शिकला.(म्हणजे अपयशा नंतर यश निश्चित आहे.)त्याला फ़क्त प्रयत्न-प्रमाद माहीत असते,पडला तरी तो,पुन्हां उठतो पुन्हां प्रयत्न करतो,महत्वाचं म्हणजे त्यांच्या प्रयत्नांना बळ देणारे,आई -वडील त्याला झालेल्या अपयशाची जाणीव होवू देत नाहीं.(कारण जाणीव करून देणाऱ्या लोकांची अजून त्याला ओळख झालेली नसते.) यावरून सगळ्यांना कळलं असेल की,आयुष्याची सुरुवातचं अपयशाने होते असली तरी अपयशावर मात प्रयत्नांनी होते.तरी आपण अपयशाला घाबरतो.       
             
आता आपण जसं-जसं मोठं होतं जातो.तसा आपल्याला अपयश शब्दाचा परिचय होतो.मुळात आपल्या जीवनाची सुरुवात,ही अपयशाने आणि शेवट पण अपयशानीचं होते.कारण मृत्यु हेचं एक मोठं अपयश आहे,आणि ते अटळ आहे.एवढं सगळं माहीत असतांना पण घाबरण्याचं कारण म्हणजे,आपल्याला कोणाला ही अपयश मान्य नाहीं,आपल्याला का,मान्य नाही?कारण समाजाला मान्य नाहीं,समाजाला का मान्य नाही,समाजात अपयशी व यशवंत दोन्ही पण राहततात.साहजीकच यशवंतांच्या मागे समाज असेल, मग आपल्याला भीती कशाची तर, एकटे पडण्याची,केलेलें कष्ट वाया जाण्याची,येणाऱ्या नैराश्याची,घरच्या आशावादी डोळ्यांत निराशावादी अश्रूंची,पाहिलेली स्वप्नं तुटण्याची,मित्राचा विश्व़ासास अपात्र ठरण्याची,या सगळ्या गोष्टी मुळे अपयश आपल्याला मान्य नाही. यश आणि अपयशाचं एक चक्र आहे.जेव्हा तुमचं अपयशाचं चक्र पुर्ण होते तेव्हा यशा चा ब्रेक लागतोच."अपयश पण आवश्यक आहे,काही वेळा अपयशातून येणारं नैराश्य सुद्धा उपयुक्त असते, त्यांतून प्रयत्नांची दिशा बद्दलवण्याचं भान मिळते."सिद्धार्थ गौतमाला राजवाड्यातील उपभोग घेत असताना नैराश्य आलं म्हणून तो बुद्ध झाला."बिल गेट्सला महाविध्यालयीन शिक्षणात आलेल्या अपयशातून नैराश्य आलं अनं त्याने संगणकामध्ये क्रांती केली.म्हणजे अपयशातून कोणीच सुटलं नाही,आज यशस्वी दिसणारे कालचे,अपयशी होते.
             अपयश हे आपल्या आयुष्यसोबत आलेलं आंधन आहे.त्यामुळे आलेले अपयशाला नमवण्याचं सामर्थ्य पण आपल्यातच आहे.म्हणून हारले तरी प्रयत्न नका सोडू, कारण "आजचा पराजय,उद्या चा विजय नक्कीचंअसतो".जिद्ध, चिकाटी,प्रामाणिकपणा आहे तसा चं ठेवा,त्यात कमी नका पडू,मग यशाचं मुकुट आपलंच आहे.......


                       - अविनाश वाघमारे

23 टिप्पण्या

  1. उत्तम आहे लेख. स्व- अनुभव घेतल्याशिवाय काही गोष्ट्टिंच महत्व कळत नाही .

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने