अंग शहारते,मनाला आणि शरीराला एक नव चेतना देणारी उर्जा प्रवाहित होते,संथ पडलेला मेंदुत ज्वाला पेटवतो, आपलाला आलेला आळस टाकून कार्यशील बनवते,उदासपणात काळवलंडले चेहरा आनंदाने गोरा होतो, दीन दुबळांना सामर्थ्यवान बनवतो, तसेंच आजचा आपला देश आणि आपले राज्य ज्या शब्दाच्या जोरावर उभे आहे, याला उभे करण्यासाठी सांडलेले रक्त, केलेला त्याग, दाखवले शौर्य,असंख्य हुतात्मा चे चेहरे,अशा सगळ्यांना जोडून उभा राहीलेला लढा कसा असेल,याचे थरारक चित्रं डोळ्यांंसमोर साक्षात उभे करते.
           आपल्या महाराष्ट्रातील लढा मध्ये प्रामुख्याने,रयतेच्या हितासाठी,रयतेचे स्वराज्य निर्माण करून,जात-पात, पंथ, धर्म न मानता समानता स्थापित करून,आधुनिक लोकशाहीची प्रतिमा निर्माण करण्यासाठी लढा देणारे, छत्रपती शिवाजी महाराज,शिक्षणाचा हक्क प्रत्येकांना आहे,शिक्षणाची दारे सर्व सामान्यसाठी खुली करण्याऱ्यासाठी लढा देणारे,छत्रपती शाहू महाराज,शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचून,तळ-गाळातील लोकांना जागृत करून समाजक्रांती घडवून आणण्यासाठी लढा देणारे महात्मा ज्योतिराव फुले व त्यात त्यांना मदत करणारी त्यांची सहचारिण,प्रथम महिला शिक्षिका,सावित्रीबाई  फुले,या सर्वांचा आदर्श व प्रेरणा घेवून,त्यांच्या राहिलेल्या कार्यचा शेवट करणार लढा लढवून ते पूर्णत्वास नेहून एक आदर्श राष्ट्र कसे असले पाहीजे,त्यासाठी आदर्श राज्य घटना तयार करणारे डॉ.बाबासाहेब आंबेडवर , त्याचं बरोबर ,संयुक्त महाराष्ट्र ते मुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी,अहो-रात्र झटणारा प्रत्येक सेनानी,या सगळ्यांच्या लढ्यामधुन निर्माण झालेला महाराष्ट्र आज आपल्या डोळ्यासमोर आहे.एवढ्या कष्टाने उभारलेल्या महाराष्ट्राची आजची परिस्थिती पाहून केलेलं कष्ट वाया गेले अस वाटतं आहे.
     
          
            त्यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र न्याय, समानता, बंधुता, धर्मनिरपेक्ष,सुरक्षितता यावर आधारलेला होता.पण आज त्या विपरीत पाहायला मिळतं आहे. काही धर्मवेडी लोकं स्वतः च्या स्वार्थीसाठी,धर्मच्या नावाखाली,द्वेष  चीड,एकमेकांनबद्दल घृणा उत्पन्न करून, दोन धर्मात तेढ निर्माण करून ,जीवघेण्यासाठी आतूर बनवत चालले पीडी घडवण्यात यशस्वी होत आहे.ज्याचा परिणाम महाराष्ट्रात रुजवलेली बंधुता नष्ट होवून ,धार्मिक दंगलीत परावर्तित होत आहे,त्यात सांडलेले निर्दोष व्यक्तीच्या रक्ताचे डाग महाराष्ट्राला कलंकित करत आहे.आणि अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक असुरक्षितेची भावना निर्माण होणें सहाजिकच आहे.खेद हा आहे की,स्वतःच्या राज्यात, स्वतःच्या घरात असुरक्षित वाटण्याचं दुर्भाग्य आपल्या वाटेला येतं आहे.नारी, अबला, यांचा आदर करणाऱ्या महाराष्ट्रात त्याच्याकडे वासनेने पाहणाऱ्या,आणि वेळ भेटताच वासना तृप्तीसाठी लांडग्यांप्रमाणे,अब्रुचे लचके तोडणाऱ्या नराधमाच्या वावर वाढत चालला आहे.असुरक्षित असलेली नारी,फक्त सुरक्षतेचा आभास मनात धरून जगण्याचा प्रयत्न करत आहे.स्त्री पुरुष समानतेचा कित्ते गिरवणार वाले, आज पण स्त्रीला दुय्यम वागणूक देतात. याची समाजात घडलेली असंख्य उदाहरणे पाहायला मिळत आहे. गरीब आणि श्रीमंत यात दिवसेंदिवस दरी वाढत चाली आहे ,गरीब हा अधिक गरीब होत आहे. आणि श्रीमंत हा अधिक श्रीमंत होत आहे. अस चाल तर आर्थिक विषमतेचा कळस गाठण्यास जास्त वेळ लागणार नाही.हे चित्र एकंदरीत संपूर्ण भारतात आहे.पण म्हणतात ना,कोणत्याही सुधारणेची सुरवात आपल्या घरा पासून केली पाहिजे,आणि महाराष्ट्र आपलं घर आहे.
       

              मग आता पुन्हा आपल्याला लढा लढायचा आहे, पण हा लढा विचारांचा आहे. जस विषाला, विष मारते.तसच वाईट  विचार चे पसरलेले विष,चांगले विचार रुजवून अमृतात परावर्तित करता यते.चला मग सुरवात करू दुरावलेले हिंदू आणि मुस्लिम बंधुता घट्ट करू,धर्मच्या नावावर आपला स्वार्थ साधणाऱ्या ढोंगीना दाखवून देवू की, त्यांच्या स्वार्थापेक्षा आमच्या बंधुत्वाचा परमार्थ किती मोठा आहे.("त्याच्या मुखातून हे शब्द निगलेच पाहिजे,भैया ये दिवार तुटती क्यु नही,मग आपण ही गर्वाने म्हटलं पाहिजे अंबुजा सिमेंट से जो बनी है") सुरक्षित अशी साखळी तयार करू ,ज्यात हिंदू-मुस्लिम वादास कारणीभूत ठरत असलेल्या थोतांड विचारांचा शिरकाव होणार नाही.स्त्रीची मानमरतब,आदर,सन्मान करणाऱ्या महापुरुषांचा महाराष्ट्र आहे,याचा थोडा पडलेला विसर जागृत करू,संशयाच्या घोळक्यात अडकलेल्या प्रत्येक स्त्री ला सुरक्षतेचा हात देवू,अशा असंख्य हाताचे सुरक्षा कवच स्त्री भोवती तयार करू,जर वासनेने आकातलेले नराधम आलाच तर हे कवच त्याच्या नरड्याचा घोट घेतल्या शिवाय शांत होणार नाही.एवढे दिवस भीतीयुक्त जीवनाची पाळलेली बंधंने झुगारून,मुक्त,सुरक्षित,मनसोक्त,
जगण्याचा आस्वाद स्त्रियांना घेऊद्या.जितके पुरुषाला महत्त्व आहे, तितकेच स्त्रियांना पण आहे,यांची जाणीव प्रत्येक पुरुषाला करून देवू, स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीचे उच्चाटन करू. माणूस म्हणून सगळ्याकडे पाहिले पाहिजे,  या विचाराच्या दृष्टीचं अंजन प्रत्येकाच्या डोळ्यांत घातलं, तर निश्चितच गरीब,श्रीमंत, उच्च, नीच, असा भेद होनार नाही.आणि आदर्श समाज, राज्य आणि देश तयारी होईल.तेव्हा समजा आपण विचाराचा लढा जिंकलो.आणि आपल्या महापुरुषांना अपेक्षित असलेले,राष्ट्र,राज्य,निर्माण झाल्याचे समाधाना ने मन गहिवरून येईल आणि आनंद अश्रूने डोळे प्रफुल्लित होईल ,व लढलेले लढा सार्थ ठरेल.....
             
  "आय पेक्षा वुई -मी पेक्षा आम्ही हा पवित्रा घेतला
                  तर येणारी आव्हाने नक्कीच कमी होतील."
 
                     - अविनाश वाघमारे 

15 टिप्पण्या

  1. अविनाश तुझे नाव अत्यंत वास्तववादी आधुनिक विचारवंत म्हणून सुवर्ण अक्षरांनी लिहल्या जाईलच
    पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने