अखंड एकसारखी धावत होती,
पण आगगाडी मात्र नव्हती...
दर्या खोर्‍यातून  कऱ्या कपारीतून,
दगड, काटे, तुडवत अनवाणी पायाने,
सैर वैर झाली होती,
पण पिसाळलेली वाघीण मात्र नव्हती..
क्षणात आकाश अन क्षणात जमीन,
गाठत होती,
पण उडणारी घार मात्र नव्हती...
डोंगराना चिरडून खळखळ आवाज करत,
वाहत होती,
पण वाहणारी नदी मात्र नव्हती...
आपल्या बेभान वेगाने सुरळीत जन - जीवन,
विस्कळित करत होती,
पण भरकटणारी वाहाटूळ मात्र नव्हती..
मग होती तरी कोण?
कोण..?
काळच्या ओघात गेलेली एक आठवण होती.....
आठवण होती... आठवण होती... आठवण होती...
     
           
      -  @viraj

4 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने