आजचा लेख हा अतिशय महत्त्वाचा वाटला म्हणुन मी लिहिला. या आठवडय़ात आपल्या अभिनयाने आपली एक चांगली ओळख जगाला करून देणारा अभिनेता काळ्या पडद्या आड गेला.हे ताजे उदाहरण आहे, असे किती तरी तरुण/तरुणी या गोष्टी चा अवलंब करून आपला शेवट करतात. पण हा त्यावर उपाय नाही. अस मला वाटते. जे मला वाटते. ते तुम्हाला पण वाटते. अस तुम्हाला मला भेटणारा प्रत्येक व्यक्ति पण सांगतो. त्यावर खूप सारे चित्रपट आहे. महत्त्वाचे म्हणजे त्या अभिनेत्या साकारलेला चित्रपटातील अभिनय त्या संदर्भात होता. अश्या घटनामुळे आपल्या समाजातील लोकांच्या मानसिक स्वास्थ्य एकदम कमजोर होत आहे. हे अधोरेखित करते. या लेखातून मी थोड मानसिक प्रबोधन करण्याचा लहानसा प्रयत्न करत आहे.
न्यूयॉर्क शहरातल्या एका शिक्षिकेने वर्षाच्या शेवटी तिच्या वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या शर्टावर "पिंक रिबिन" चा बो लावला. त्या रिबनवर लिहिले होते. तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे.प्रत्येक विद्यार्थ्याला संदेश वाचून खूप आनंद झाला.''वा, माझ्यामुळे शिक्षिकेच्या आयुष्यात फरक पडला आहे.'' पण नुसते एवढेच करून ती शिक्षिका थांबली नाही. तिने प्रत्येक विद्यार्थ्याला अजून तीन रिबन दिल्या व सांगितले, ''तुमच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना धन्यवाद द्या व त्यांच्या कपड्यावर ही पिंक रिबन लावा.''एका विद्यार्थ्याने शेजारच्या घरात राहणार्या एका तरुणाच्या शर्टावर, ''धन्यावाद, तुझ्यामुळे माझे आयुष्य बदलले आहे म्हणून मी तुला ही पिंक रिबन लावतो. '' असे म्हणत रिबन लावली. तो शेजारी एका कार्यालयात कनिष्ठ कर्मचारी होता. त्याने त्या विद्यार्थ्याला अभ्यासात मदत केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेत अव्वल क्रमांक मिळाला होता.विद्यार्थ्याने उरलेल्या दोन रिबन त्याला दाखवत विचारले, ''आम्ही शाळेसाठी एक प्रकल्प करत आहोत.
तुझ्या आयुष्यात ज्या माणसामुळे चांगला बदल झाला आहे त्यांना ही रिबन लावशील का?''कर्मचारी लगेच तयार झाला. दुसर्या दिवशी त्याने आपल्या वरिष्ठांना जाऊन ''धन्यवाद " तुमच्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे." असे म्हणत पिंक रिबनचा बो लावला. वरीष्ठ अधिकारी अत्यंत हुशार होता, कंपनी त्याच्यामुळे चालली होती; पण तो खडूस म्हणूनही प्रसिद्ध होता. तरीही कर्मचार्याने बो लावल्यावर अधिकाऱ्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो म्हणाला, ''माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात बदल झालाय? तुझ्यासाठी मी इतका महत्त्वाचा आहे हे मला माहीतच नव्हते. धन्यवाद, ''कर्मचार्याने त्याला सांगितले, ''ही कल्पना माझी नाही. हे एका शाळेतीला प्रकल्प आहे. आयुष्यात बदल करणार्या लोकांना धन्यवाद देऊन त्यांना हा पिंक रिबनचा बो लावायचा. तुम्हाला आवडेल असे करायला?'' वरीष्ठ अधिकारी एकदम म्हणाला, ''हो नक्की आवडेल. आहे तुझ्याकडे अजून एखादा बो?'' कर्मचार्याने आपल्याकडचा उरलेला बो अधिकार्यांना दिला. अधिकारी घरी गेला. त्याने आपल्या मुलाला बोलावले . मुलाच्या शर्टावर पिंक रिबनचा बो लावत तो म्हणाला, ''मी कामामुळे उशिरा घरी येतो, घरी आल्यावर माझी चिडचिड होते, मी तुझ्याशी प्रेमाने बोलतही नाही, मी आजवर तुला कधी हे सांगितले नाही, पण तू जसा आहेस तसाच रहा. तुझे असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. "तुझ्या असण्यामुळे (माझे ) आयुष्य बदलले आहे".मुलगा ढसाढसा रडायला लागला. तो म्हणाला, ''बाबा , मला वाटायचे की तुला मी अजिबात आवडत नाही. मी तुला कधीच खूश करू शकणार नाही म्हणून आज रात्री मी आत्महत्या करणार होतो. हे बघा, मी तुम्हाला आणि आईला चिठ्ठी लिहून ठेवली होती. पण ही रिबन लावलीस आणि माझं आयुष्य बदलवलेस बाबा.''बाबाने चिठ्ठी वाचली. त्याने आपल्या मुलाला घट्ट पोटाशी धरले. दोघेही एकमेकांच्या मिठीत आनंदाचे अश्रू ढाळत होते. त्या एका रिबनमुळे मुलाला बाबा व आयुष्य दोन्ही मिळाले होते. आणि बापालाही मुलगा मिळाला होता.आई मुलांविषयीचे प्रेम सहज व्यक्त करू शकते.मुलेही आईशी मोकळेपणाने बोलू शकतात.आईला ते जन्मजात लकब असते. कारण स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते.पण पुरुष हा क्षणाचा पिता असतो, पण म्हणून त्यांचे महत्त्व मुलाच्या आयुष्यात कमी नसते. उलट अनेक मुले वडिलांच्या नजरेतही आपण कोणीतरी असावे यासाठी आयुष्यभर झटतात. पण काही वडिलांना त्याबद्दल काहीच वाटत नसते. मुलांकडे पूर्णत: दुर्लक्ष करत हे पुरुष कामात मग्न रहातात. म्हणतात ना, कोणीही पुरुष बाप सहज बनू शकतो, पण बाबा होणे काहींनाच जमते.चांगला पालक होणे ही प्रवृत्ती आहे. असिधारा व्रत आहे. त्यासाठी शिक्षण, जात, धर्म यांपैकी कशाचीही अवश्यक्ता नसते. फक्त इच्छा असावी लागते.
मला यातून एवढ सांगायचे आहे. जीवनात चड उतार येतात त्यात मी तुम्ही किंवा जगातील कोणताही इसम सुटला नाही. कोणाच्या वाटेला जास्त, कोणाच्या त्यापेक्षा कमी, कोणाच्या फक्त कठीण,पण कठीण प्रसंग येतातच. तो प्रसंग तुम्ही किती सोपा करता त्यावर खर तर आयुष्य अवलंबून आहे. अश्या प्रसंगात प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणी तरी खास व्यक्ती असतो. ज्याच्या जवळ आपल्या मनात फिरणारे विचाराचे वादळ, दुःख, नैराश्य, अपयश, पासून सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला सांगुन मनावर प्रभावी ठरणार विचारचं वादळ थांबू शकतो किंवा परतुन तरी लावु शकतो. आपल्या मानसिकतेचा एक भाग आहे तो, जेव्हा आपले विचार आपल्यावर प्रभावी ठरते, त्यातून मार्ग काढणे कठीण बनते. अश्या वेळेस आपल्याला त्या व्यक्ति ची गरज भासते. मग ती व्यक्ति, वडील, आई, बहीण, भाऊ, मित्र, कोणी पण असेल तर बिनधास्त पणे त्या व्यक्ति जवळ मोकळे व्हा. साध उदाहरण आहे. एखादी नदी आपण बांध बांधुन तिला अडवू शकत नाही. जर अडवले तर थोड्या दिवसांनी ती तीच विनाशकारी रूप धारण करेल ज्याचं रूपांतरत महाकाय पुरात होईल. मोजू शकणार नाही एवढी जीवीत हानी करेल. तसचं आपल्या मनाचं आहे. आपण आपल्या मनातील विचाराला बांध टाकतो, मग ते विचार मनातल्या मनात अडून नदी प्रमाणे विनाशकारी रूप धारण करते आणि डोक्यात नकारात्मकतेचा पूर आणते. ज्याचं रूपांतर आपल्या विनाशत पण होवू शकते. म्हणुन येणार्या विचाराला अडवून ठेवू नका त्याला वडील, आई, भाऊ, मित्र रुपी वाट करून द्या. हीच ती पिंक रिबिन आहे जे तुम्हाला विनाशाच्या दारातून ओढुन आनते. मग कसा विनाश करते बघू.
"जेवणात जर कोणी विष कालवले तर त्यावर वैद्यकिय उपचार आहे, परंतु मनामध्ये जर कोणी विष भरवले तर त्यावर फक्त आणि फक्त शब्द रुपी उपचारचं प्रभावी ठरते. "
"अप्रतिम आयुष्य बिघडवायला वेळ लागत नाही पण घडवायला आत्मविश्वास लागतो मन मोठं असावं लागतं."
" मावळलेला सूर्य पुन्हा आनंद घेवून उगवतो.
त्याप्रमाणे आलेले संकट परतून आपल्या जीवनात आनंदाची सकाळ होते. "
- अविनाश वाघमारे
उत्तर द्याहटवा👌👌👌👌Nice
✌️✌️👍👌
उत्तर द्याहटवाप्रेरणादायी👌👌👌👌
उत्तर द्याहटवा👌👌👌👌
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लिहिला आजचा लेख. .
उत्तर द्याहटवाThanks avi bahu.....ya Topic wr lihlas mnun...
निशब्द
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवाEnjoyed reading the article above , really explains everything in detail,the article is very interesting and effective.Thank you and good luck for the upcoming articles.🙂🙂
Mast
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा