सकाळी उठल्या पासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या डोक्यात नगण्य असे विचार येतात.त्यात काही सकारात्मक तर काही नकारात्मक, हे चक्र अखंडितपणे चालू असते. अनेक मानसशास्त्रीय तज्ञ यांच्या संशोधनानुसार सध्या विचारांचा कल नकारात्मकडे जास्त झुकत चालला आहे. असे असले तरी एक सकारात्मक विचार किती तरी, नकारात्मक विचाराला परावृत्त करते हे पण त्यानीचं सिद्ध केले. म्हणजे दिवसातून एक जरी सकारात्मक विचार आला तर आपण किती तरी नकारात्मक विचारावर विजय मिळवू शकतो. यावरून आणखी एक गोष्ट सिद्ध होते की, आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण कसा विचार करतो यावर अवलंबून आहे.
तुम्हाला मी नकारात्मक विचारांकडे सकारात्मक कसे बघायचे, यासाठी काही उदाहरण देतो.
त्या मधील पाहिले उदाहरण,आज पण खूप लोक या गोष्टीला मानतात की काळी मांजर आडवी गेली की, खूप लोक त्या रस्त्यांन जात नाही, किंवा एखादे काम करणार असेल तर होणार नाही, आपल्या सोयी प्रमाणे निरनिराळे तर्क अनुमान चालू करतात. मुळात त्या मांजरीला काय माहीत तुम्ही काय कराला चालला होता. अजून कदाचित जस तुम्ही घाईत होता. तस ती पण असू शकते. खर तर त्या मांजरी मुळे काही फरक पडत नाही, पण ती दिसली की, तुम्ही तुमच्या मनाततील सकारात्मक विचाराचे परिवर्तन नकारात्मक विचारात करता. त्यानंतर काही घडले की, तुम्ही काळ्या मांजरीला दोष देवून मोकळे होतात. पण त्यात मांजरीचा काहीच दोष नाही, दोष आहे तुमच्या नकारात्मक विचारांचा. तुम्ही त्या गोष्टीला सकारात्मक घ्या, सामान्य पणे जस आपण कोणाला आडवं जातो. त्याप्रमाणे ती पण जाते. असा विचार केला, तर हजार काळ्या मांजरा जरी आडव्या गेल्या, आणि तुम्ही तुमचा विचार सकारात्मक ठेवला, तर काहीच फरक पडणार नाही. "नकारात्मकता संकट उत्पन्न करते तर, सकारात्मकता त्यावर मात."
दुसरे उदाहरण, आजचं जे प्रकाशित जग बघत अहो, ते दाखवणार्या थोर शास्त्रज्ञ यांचे आहे. त्यांचे नाव आहे, थॉमस् अल्वा एडिसन, यांनी 999 प्रयोग केले - हजाराव्या प्रयोगाच्या वेळेला विजेचा दिवा लागला. थॉमसला ज्यावेळेस पत्रकारांनी मुलाखतीत विचारलं. थॉमस 999 प्रयोग तुझे फसले याबाबत तुला काय वाटते? यावर थॉमस म्हणाला, 999 प्रयोग फसले असे म्हणू नका. 999 वेळा मी हे सिध्द केलं, या मार्गाने विजेचा दिवा लागू शकत नाही. (यापेक्षा सकारात्मक उत्तर कोणते नसेल.) अपयशाला सकारात्मक घेतल तर मिळणारे यश निश्चित खूप मोठ असते. हे थॉमस् अल्वा एडिसनने सिद्ध केले.
आता तिसरे उदाहरण आपल्या विजयांनी सगळ्यांना हादरून सोडणारे जस काय, विजय ध्वज जन्मता आपल्या हातात घेवून येणारे नेपोलियन, एकदा नेपोलियन समुद्र किनार्यावर सैन्यासमोर जहाजातून उतरतांना पाय चिखलावर घसरून छातीवर आडवा पडला, छाती चिखलाने माखली. तेव्हा अंधश्रध्दाळू सैनिकांना वाटलं. आपला सेनापती आडवा झाला म्हणजे आज आपला पराभव होणार, आपली मुंडकी उडणार - सैनिक भयभत झाले. नेपोलियनने ही बाब हेरली. तो उठताना छातीत झटकत म्हणाला, ‘मित्रांनो आजचे युध्द आपणच जिंकणार, जिथे जिथे आपण जाऊ तेथे - तेथे आपला विजय होणार’ कारण आल्या आल्या या भूमीने मला अलिंगन दिले आहे - मी तुझी आहे, मी तुझी आहे.... हे ऐकताच सैनिकांचे मनोबल वाढले व सगळीकडे मोठी विजयश्री त्यांनी खेचून आणली. हे घडलं सकारात्मक दृष्टीकोनामुळे. म्हणजे त्यांच्या विजयाचे खरे रहस्य होते त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन. त्याचा फायदा असा झाला की, सैनिकांनी नकारात्मक विचार डोक्यात आणलाचं नाही. म्हणुन आधी आपण मनातून हरतो,नंतर युद्ध भुमिवर. सैनिक अणि नेपोलियन दोघे सकारात्मक होते म्हणुन पराजयला समोर गेले नाही.
चौथे उदाहरण अतिशय सामान्य आहे. कदाचित रोज आपल्या डोळ्या समोर घडते. टेबलावर एक ग्लास पाण्याने अर्धा भरला आहे. जर असा विचार केला की, अर्धा भरला आहे त्यामुळे मन समाधानी होतं. पण तो अर्धा रिकामा आहे म्हटलं की, नैराश्य, व्याकूळता, हताशपण येतं. सकारात्मक दृष्टीकोन मनाला प्रसन्न करून - अतिरिक्त ऊर्जा प्रदान करतो त्यामुळे कर्माला गती प्राप्त होते आणि आत्मविश्वास वाढतो. नकारात्मक विचार मनाला व शरीराला दुर्बल करतो. परिणामी कर्माची गती मंदावते, चुका होतात, हानी होते व यातूनच औदासिन्यता येते.
पुढिल उदाहरण, जगला शांतीचा संदेश देणारे, दुःख, क्लेश, निवारण करण्याचा मार्ग सांगणारे,एकंदरीत जीवनाचा खरा सार सांगणारे, गौतम बुध्दाजवळ एक शिष्य धापा टाकत आला व म्हणाला भगवान ‘‘मला गावकर्यांनी शिवी दिली.’’ बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं त्यांनी तुला मारलं नाही.’’ तो म्हणाला ‘‘भगवान नंतर त्यांनी मला मारलं सुध्दा’’ बुद्ध म्हणाले ‘‘या मारामुळे तुला काही जखम झाली का ?’’, शिष्य म्हणाला ‘‘भगवान माझं डोकं फुटलं आहे.’’ गौतम बुध्द म्हणाले ‘‘बरं झालं - तुझा मृत्यू झाला नाही.’’ हे ऐकून शिष्य शांतपणे बुध्दाच्या चरणाजवळ शांत बसला, बुध्दांना हेच सांगायचे होते की, जी घटना घडली त्यापेक्षा वाईट घटना घडू शकली असती पण ती घडली नाही यामुळे समाधानी रहा. मी अस्वस्थ आहे, पण लोकं माझ्यापेक्षा जास्त अस्वस्थ आहेत असा विचार मनाची तात्कालीक अस्वस्थता बर्याच प्रमाणात नियंत्रीत करतो.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांना नौदलात भरती होता न आल्यामुळे पुढे ते शास्त्रज्ञ व देशाचे राष्ट्रपती झाले.काही वेळा अपयश हे महान यशाचे पण सूचक असते. म्हणून सकारात्मक विचार करा व आनंदी रहा.सकारात्मक विचार आपली शक्ती, आत्मविश्वास, मनोबल वाढवतात. नकारात्मक विचारांना - सकारात्मक करणे म्हणजे मनाचेच - मनाशी युध्द करणे होय. यालाच तुकाराम महाराज म्हणतात. ‘‘रात्रं दिनं आम्हां युदधाचा प्रसंग’’
यावरून मला सकारात्मक विचाराचे महत्त्व अधोरेखित कराचे होते, व ते मी केले. सकारात्मकता जीवनाला यशाचं वळण लावते. म्हणुन सकारात्मक रहा जीवनात आनंद आपोआप येईल.
"कोण म्हणते जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंकचं आहे.
अरे डोळे उघडून बघा प्रत्येकाला उडण्यासाठी
फुलपाखरा सारखे पंख आहे."
- अविनाश वाघमारे
Aaj kal sarwach tan tanawach jiwan jagat ahe tyat nakaratmakta
उत्तर द्याहटवा& nairash wadht ch jat ahe...tu khup apratim lekh lihla ahes..khup positive ahe ha lekh.
Khup sadhya shabdhat & vyavsthit mandni krun smjwal ahes.. tu dilele sandhrbh khup chan ahe..History chi pn mahiti dilis..khup chan.
Asch liht jaaa...
Nice article avi sir
उत्तर द्याहटवाTq sir
हटवाखुप छान उधाहरण दिले अहेस...
उत्तर द्याहटवाTq so much
हटवाखूप छान सर आज मला खूप ज्ञान भेटले आजपासून मी सकारात्मच विचार करणार
उत्तर द्याहटवाTq sir
हटवाअगदी बरोबर अविनाश
उत्तर द्याहटवाआता श्रीमंत अधिक श्रीमंत व गरीब अधिक गरीब होत चालला याबद्दल शासनाच्या चुकीच्या धोरणावर वास्तविक लिखाण कर
Tq ani nakkich kahi divsat tyavr lekh lihto
हटवाअवि दा हा लेख खूपच सकारात्मक ऊर्जा देऊन गेला. .. .
उत्तर द्याहटवाTq gana
हटवाटिप्पणी पोस्ट करा