खर तर मला आज प्रश्न पडला की, लोक दान करत आहे की उपकार, आपण त्या भारतात अहो, ज्या भारतात दान शूर कर्ण होवून गेला. दान काय आहे आणि कसं करावं हे कर्ण शिकवून गेला. त्याच्या दानात स्वार्थ, अहंकार, मी पणा, नव्हता. केल्याला दाना बरोबर तो त्या व्यक्तीला पण विसरून जात होता. पण आज सगळे उलटे पाहायला मिळत आहे. दान देणारा हे सगळ विसरुन, एकदम विरुद्ध वागत आहे. त्याच्या दानात आज स्वार्थ दिसत आहे, म्हणुन त्यांनी केलेले दान, घेणार्याला उपकार वाटत आहे. मी तुम्हाला खरं दान कसं असलं पाहिजे या साठी काही दाखले देतो.
दान हे नाव आलं तिथे पहिला दाखला कोणाचा येणार? हे कोणालाच सांगा लागत नाही. हो तोच, वासुसेन, राधेय, सूर्यपुत्र कर्ण, त्यांचा हा दाखला. एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये संभाषण होत असते. जोर - जोरात हसत त्यांचा चांगलाच संवाद रंगला असतो. तेवढ्यात एका- एकी श्रीकृष्ण शांत होतात. अचानक आपल्या चेहर्यावरील हास्य भाव गांभीर्यात परावर्तीत करून, "अर्जुन तुला ते गाव दिसतं आहे का?
अर्जुन - हो दिसत आहे.
श्रीकृष्ण - त्या गावाच्या बाजूचा डोंगर दिसत आहे.
अर्जुन- माझी दृष्टी अत्यंत स्पष्ट आहे. मला तो डोंगर एकदम ठळकपणे दिसत आहे. तुम्ही माझी दृष्टी कमी झाली असे समजत असाल तर, ते शक्य नाही. कारण हे डोळे एका योद्धयाचे आहे.
श्रीकृष्ण - मला तुझ्या दृष्टीवर कसलाचं संशय नाही अर्जुना, तुला हे सांगायचे आहे की, तो जो डोंगर दिसतो का? त्या डोंगरात खूप सार सोनं आहे. तुला ते सोनं, त्या दिसणार्या गावातील लोकांना वाटायचं आहे. आता तू ठरवं कस वाटायच ते.
अर्जुन - हे ऐकताचं एकदम गर्वाने, मी वाटू?
श्रीकृष्ण-होय, तूच वाट.
अर्जुन -ठीक आहे. अस म्हणुन अर्जुन गावत गेला. पोहोचताच त्यांनी सगळ्याना सांगितल की, मी सोनं वाटणार आहे. ज्यांना ज्यांना लागते त्यांनी डोंगरा जवळ यावे. अर्जुन सामोर, संपूर्ण गाव त्याच्या मागे, ते पाहून अर्जुनाच्या डोळ्यात अहंकार, स्वार्थ, मीपणा, आपण उपकार करत अहो, हे त्याच्या वागण्यातून दिसत होत. तो डोंगर खोदून लोकांना सोनं वाटत होता. पण लोक पुन्हा - पुन्हा येत होते. तो खोदून खोदून अक्षरशः दमला पण लोक काही केल तर, कमी नव्हते होत. शेवटी म्हटला, श्रीकृष्णाना माफ कर मला एवढच वाटता येते. अस म्हणुन सगळे बंद केले.
दुसर्या दिवशी पुन्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यात संभाषण चालू असते. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला, "काल तू जे दान केल ते आज कर्णाला करा लावणार आहे."
अर्जुन - होय का? कर्ण पण दमल्या शिवाय राहणार नाही. हे शब्द उद्धगारले आणि जोरात हसला.
श्रीकृष्ण - काही न बोलता निरोप घेवून, कर्णाला भेटायला निघतात. (व पोहोचतात. ) कर्ण, श्री कृष्णाला बघता आनंदित होतो. (दोघांचा संवाद चालतो.)
श्रीकृष्ण - तुला ते समोरील गाव दिसत आहे का?
कर्ण - हो दिसत आहे.
श्रीकृष्ण- गावाच्या बाजूला असलेले डोंगर.
कर्ण - हो तो पण मला दिसत आहे.
श्रीकृष्ण - त्या डोंगरात काय आहे माहीत आहे का?
कर्ण - नाही माहित.
श्रीकृष्ण - त्या डोंगरात खूप सारे सोनं आहे.
कर्ण - अरे वाह!चांगली गोष्ट आहे.
श्रीकृष्ण - तुला जर ते सोनं वाटायला दिल तर.
कर्ण - माज भाग्य समजेल मी ते.
श्रीकृष्ण - मग जा आता, त्या गावातील लोकांना वाट ते सोनं.
कर्ण - एकदम आनंदाने प्रफुल्लित झालेले चेहरा, त्या चेहर्यावर स्वार्थ नाही, अहंकार नाही, आणि काही क्षणात, श्री कृष्णाला परवानगी मागून, त्या गावाकडे निघाला. पोहोचताच गावत, त्यांनी सगळ्या गावांतील लोकांना त्या डोंगरावर बोलवले.
व सांगितले आज पासून हा डोंगर तुमचा, यात जेवढं सोनं आहे ते सगळं तुमच आहे ज्याला जेवढे लागते त्यांनी घ्यावे. अस सांगुन निघून गेला.
"दान हे स्वाभाविक असलं पाहिजे, एखाद्याचे पाहून किंवा जबरदस्तीने दान करणे म्हणजे स्वार्थ, अहंकार, मी पणा, उपकार ह्या गोष्टी त्या दानात जाणवतात. आणि त्या अर्जुना मध्ये दिसल्या तो स्वतः दाखवत होता की मी दान करत आहे. याउलट कर्ण हा दान करून तिथून निघून गेला. त्याच कार्य होत दान करण तो पार पाडून निघून जाणे हे खरं दान आहे. त्याच श्रेय घेत असाल तर मग त्या दानाचं रूपांतर उपकारात होईल. मग आता यावरुन ठरवा तुमचं दान अर्जुना सारखं की, कर्णा सारखं असलं पाहिजे.
पुढिल दाखला स्व अनुभवाचा आहे. माझ्या एका जिवलग मैत्रिणीचा आहे. मी तिचे नाव सांगून तिचे केलेले दान अर्जुनाच्या दानात परावर्तीत नाही करणार. कारण तीच दान कर्णा सम श्रेय न घेणारं आहे. मनाने आणि पैशाने खूप कमी लोक श्रीमंत असतात. त्यातली ती एक, समजूतदार, प्रेमळ, मानाने एकदम निर्मळ, नात्याचं महत्त्व जाणारी, नातं जपणारी, जबाबदारीची नेहमीच जाणीव, आपल्या प्रेमळ मनाने क्षणांत, परक्यांना पण आपलं करणारी, प्रत्येकाची काळजी करणारीच नाही तर, घेणारी पण,अश्या कितीतरी उपमा तिच्या नावासमोर लागते. मी फक्त तिची ओळख व्हावी एवढ्याच लावल्या. आता तुम्हाला तीचं खूप कौतुक वाटलं असेल, मूळातं आहेच, ती कौतुक करण्यासारखी, आमची चांगली ओळख असून पण मला कधीचं
माहीत नव्हतं, ती तिच्या वाढदिवसाला अनाथ बालकांना दान करते. अस ते वर्षानुवर्षे करत आहे. महत्त्वाचं म्हणजे कधी तिने ओळखूच येवू दिल नाही.
हा दाखला इटली मधील आहे, तिथे एक कॉफी शॉप आहे. आणि शॉप मध्ये एक सुंदर भिंत आहे. कॉपी घ्यायला येणारा एक व्यक्ति असला तर, दोन कॉफी ची ऑर्डर देतो. मग त्याला नियमाने दोन कॉफी द्यायला पाहिजे. पण तिथे तस नाही एक कॉफी त्याला पिण्यासाठी देतात. व दुसर्या कॉफीचं फक्त बिल त्या भिंतीवर लावल्या जाते. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की, ते बिल कशासाठी भिंतीवर लावतात. त्याचं कारण असं ज्या गरिबाला कॉफी प्यावीशी वाटली आणि खिशात पैसे नसताना जर आला .त्याला कुणाकडेही हात पसरावे लागले नाही पाहिजे, किंवा कुणाकडेही याचना करण्याची वेळ आली नाही पाहिजे. त्यासाठी भिंतीवर ते बिल लावले जाते. एखादा गरीब आला आणि कॉफी पिऊन, बिल न देता निघून गेला. तर ते समजून जातात. व त्या भिंतीवरील बिल काढून कचरा पेटीत टाकून देतात. पण त्यात तुमच्या हे गोष्ट लक्षात आली असेल. दान देणारा आणि ज्याला दान मिळाले ते दोघे पण, अनामिक,आहे. दान देणार्या ला आपले दान कुणाला जाणार याची कल्पना नसते; पण त्याला नक्की ठाऊक असते की हे सत्पात्री दान आहे.
म्हणुन स्वाभाविक दान करा, समोरचा व्यक्ति करत आहे, म्हणुन त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी दान नका करू. आपला मोठेपणा दाखवण्यासाठी दान करू नका. दान कराचं म्हणुन करू नका, जर खरं दान कराच तर कर्णा सारख करा, श्रेय, स्वार्थ, बाजुला ठेवुन, त्या मुलीसारखं अनामिक राहून, इटली मधील लोकांन सारख नि-स्वार्थ, हेच खरं दान ठरेल.
- अविनाश वाघमारे
Kya baat hai . Avi
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाBadhiya, avi👌👌👌
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवाएका हातानी दिलेले दान दुसऱ्या हाताला कळू नये, असे दान असावे, सुंदर लिखाण
उत्तर द्याहटवाखुप सुंदर खरंच दान काय आहे आणि काय करायला पाहिजे माणसाने यातून खुप सुंदर मार्गदर्शन दिल सर धन्यवाद
उत्तर द्याहटवाअगदी सोप्या शब्दात मांडणी केली आहे . अभिनंदन सर
उत्तर द्याहटवाKhup chan, sundar lekh with gud conversation and examples.
उत्तर द्याहटवा👌👌👌👌❤️
उत्तर द्याहटवा👌👌👌👌😍
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा