रणरणत्या उन्हांत
अन् जळणाऱ्या मातीच्या कणात
तुझ्या अनवाणी पायाला
बसणारे चटके
मला कधी कळलेच नाही
कारण माझे पाय या आगीत
कधी पोळलेच नाही....
भूकेने व्याकूळ होऊन
अन्नाची आस धरणारे
अन् पाठीला जाऊन
भिडणारे तुझे पोट
मला कधी कळलेच नाही
कारण भूकेच्या डोंबात
माझे पोट कधी जळलेच नाही..
तु घातलेल्या कपडयांना नेहमी
कष्टाच्या अत्तराचा वास होता
पण मला मात्र ती दुर्गंधी वाटली
तुझ्या कष्टाचे मोल
मला कधी कळलेच नाही
कारण गरीबीने मला
कधी छळलेच नाही..
- अविराज
मलाही कळल नाही तुमच गुपीत काय???
उत्तर द्याहटवाखुप छान
अवि दा खूप जबरदस्त
उत्तर द्याहटवाभाऊ मस्त
उत्तर द्याहटवाAvi sir तुम्ही भावनिक कवि आहात ते आम्हाला कधी कळलेच नाही.. 👌👌
उत्तर द्याहटवाअप्रतिम ❤️❤️
Tumch chupi kala aamhala kadhi kadlich nahi...
उत्तर द्याहटवाNo words...khup chan...lihlay☺️
उत्तर द्याहटवाNice Sir
उत्तर द्याहटवादररोज बरोबर असून देखिल तुमच्या मध्ये एक अप्रतिम कवी दडलेला आहे हे मला कधी कळलच नाही....
उत्तर द्याहटवाMast Avi
उत्तर द्याहटवाएकदम कडक
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा