भारतात दिवसाची सुरवात, रात्रभर मरगळलेल्या शरीराला तरतरीत करणारे, मॉर्निग वॉक करून आलेल्या लोकांच्या थकवा घालून, गप्पा गोष्टीला ऊस्फुरण चढवते. वृद्धांच्या जीभेची तलब, लहान मुलांच्या ब्रेड, तोष, पाव, सोबतचा साथीदार, मित्राच्या गप्पा रंगवणार उपयुक्त भागीदार,प्रियकर प्रेयसीला एकमेकांच्या ओळखीच कारण, कामाचा किंवा अभ्यासाचा आलेला कंटाळा दूर करून, एकदम ताजेतवान करून, नवीन जोश अंगात भरणारा, म्हणजे आपला चहा....
   

     या चहाच्या रोचक प्रसंगावरून वरून आपल्या जीवनाशी सांगड घालून बघू, कारण मला विचार करायला लावणारा विचार माझ्या मनात आला. त्या विचारणे मी तुम्हाला विचार कराला लावले तरच माझ्या विचारचे सार्थक होईल.
    असे एक दृष्य डोळ्यांसमोर आणा कि तुम्ही चहा घेत बसलेला आहात.तुमच्या मागुन अचानक कोणीतरी येतो आणि तो तुमच्या पाठीवर थाप मारतो किंवा तुमच्या मागुन जाता जाता तुम्हाला त्याचा धक्का लागतो.त्यामुळे तुमच्या हातात असलेल्या कपातील चहा डुचमळते आणि सांडतो. आता मला सांगा तुमच्या कपातील चहा का सांडला …?तुम्ही मनात म्हणाल काय मुर्खासारखा प्रश्न विचारतो आहे.आणि तुम्ही उत्तर द्याल, ” का सांडला म्हणजे काय…?त्या माणसाने मला धक्का मारला किंवा त्याचा मला धक्का लागला म्हणुन माझ्या कपातील चहा सांडला… अजून काय..?"आता बाळबोध विचारानुसार तुम्ही अगदी बरोबर सांगीतलेत… पण नाही, तुमचे उत्तर चुकिचे आहे…


कसे.??अहो, तुमच्या कपामध्ये चहा होता म्हणून चहा सांडला. त्यात जर काॅफी किंवा दुध असते तर चहा सांडला असता का..? नाही ना..?म्हणून तुमचे उत्तर चूकिचे होते. माझ्या कपात चहा होती म्हणून चहा सांडला,असे उत्तर असायला हवे होते…? हे अतिशय सामन्य लॉजिक आहे. तुम्ही म्हणाल काय विचीत्र लॉजिक आहे. नाही विचीत्र नाही.याच घटनेची आपल्या रोजच्या आयुष्याशी सांगड घालून बघा.कपाच्या आंत जे आहे तेच सांडत असतं हे लक्षात येईल तुमच्या.जेव्हा आयुष्य अशा काही घटनांनी आपल्याला हलवतं तेव्हा जे आपल्या मनात असतं त्याप्रमाणेच आपली प्रतिक्रिया बाहेर येते.तेव्हा आपणच आपल्या मनाला विचारायला हवे, बाबा, काय आहे रे तुझ्या कपात..?
आनंद,
कृतज्ञता,
शांती,
प्रेम,
नम्रता,
आपुलकी,
मधुर वाणी,

की,

वैमनस्य,
क्रोध,
कटुता,
द्वेष,
असुया,
कठोर शब्द…..?
एकदा हे आपलं आपल्यालाच कळलं की उमजेल,धक्का लागला की, काय बाहेर येतं ते, मग आता निवडा आता तुमच्या कपात
खरच काय असायला हवे ते,ज्यायोगे आपलं आयुष्यही समृद्ध होईल आणि आपण ईतरांनाही आनंद, प्रेम देऊ शकू.
             

शेवटी मला काही वि. दा. करंदीकर यांच्या काही ओळी आठवल्या

       "असे जगावे दुनियामध्ये, आव्हानाचे लावूननी आत्तर
       नजर रोखून नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर..
       करून जावे असेही काही, दुनियेतून या जातांना
       गहिवर यावा जगास सार्‍या, निरोप शेवटचा देतांना..."
         
                     

9 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने