लॉक डाऊन,
खर तर हा शब्द च माहीती नव्हता, परंतू या काही दिवसात ज्या बालकाला थोड बोलता येते असा, किवा खूप कमी प्रमाणात एकू येते अशे आजी - आजोबा या सगळ्याना परिचयाचा झाला,फक्त त्या सोबत अस बोल की, अंगावर शहारे नक्कीच येत असेल, लॉक डाऊन वाढवण्यात येत आहे. म्हणुन 2020 चा जगातील प्रभावी शब्द निश्चित च ठरेल. मुळात आपण सगळ्यानी लॉक डाऊन चा एकदम चुकीचा अर्थ घेतला, कारण मी पण पहिले आठ दिवस असाच विचार केला की,बंदिस्त झालो. तेव्हा माझ्या गमनावर बंधन आल, म्हणजे मी बंदिस्त झालो असा चा विचार आला, नंतर मी स्वतः विचार केला खरच बंदिस्त झालो का, तस तुम्ही स्वतः विचार करा कशाने बंदिस्त आहात, तेव्हा सगळ्याना एकच उत्तर मिळेल, विचार, आचार, घरातील प्रत्येकाला बोलू शकतो, मन झाल तर हव त्या मित्रा सोबत भ्रमणध्वनी वर वार्तालाप करू शकता, तुम्हाला जे हव ते बनवून खाऊ शकता,झोप पूर्ण घेवू शकता, सकाळी उठू वाटलं तर उठा नाही तर नका, (कित्येकांना सकाळी उठण्याचा कंटाळा आहे. त्याबरोबर अस पण वाटलं असेल आज उठायच नसत तर बर झालं असत मग आज हे च बंधन कस झाल) विरंगुळा म्हणुन तुम्ही तुमच्या कलेला जपू शकता वेळ देवू शकता, मग एवढी सगळी मोकळीक असून ही तुम्ही बंदिस्त कसे आहात,याच निराकरण होईल. फक्त बाहेर फिरण्यावर निर्बंध म्हणजे बंदिस्त होत नाही हे कळल असेल.
      बंदिस्त कधी होता ते सांगतो थोड, आता तुम्ही थोड तुमच लॉक डाऊन पूर्वीच जिवन बगा, उदाहरण घेवू -खाजगी कार्यालयातील सेवक - सकाळी उठल्यापासून चालू होते, रात्री तो स्वतः वर गजर चे बंधन लावतो, लावलेला गजर कसोशीने पाळते, सकाळी मुळीच त्याची उठाची इच्छा नसते, मग तेव्हा त्याच्या मनात येते की उठलो नाही तर, कार्यालयात वेळवर पोहचणार नाही, मग येते वेळच बंधन, आता सगळ करून कार्यालयात वेळेवर पोहोचतो, तिथे आता दिवसभर दिलेले काम पूर्ण करण्याच बंधन, नाही केल तर वर चा अधिकारी काय म्हणणार याच बंधन, आता हे सगळे बंधन पाळून घरी येतो, घरच्या ना वेळ देवू वाटते, मुलासोबत खेळू वाटते, बायको सोबत संवाद करू वाटते,विरंगुळा म्हणुन येणारी कला जपू वाटते, हे सगळ कराच ठरवून त्याची नजर भिंतीवर च्या घड्याळावर पडते, तिथे खूप वेळ झाला दिसते आणि आलेले सगळे विचार क्षणात मनात दडपून टाकतो, कारण डोळ्या समोर उद्याच बंधन दिसते. आता येते तुम्हाला फक्त गमन करण्याच बंधन नाही,पण बाकी सगळे बंधन आहे, आता खर लॉक डाऊन कोणते,फक्त शब्द नव्हता माहीत, ते आता माहीत झाला, कोणी पण त्या जागी असू द्या त्यावर बंधन हे सारखी नक्कीच होती. उलट आता एकच बंधन, बाकी सगळे करण्यासाठी तुम्ही मुक्त आहात मग तरी तुम्ही बंदिस्त कशे समजता. फक्त तुम्हाला हे आज का समजत आहे, की तुम्ही आता विचार केला, अणि विचार का केला, तर वेळ मिळाला म्हणुन,याचा अर्थ लॉक डाऊन पूर्वी तुम्ही विचार करू शकत नव्हता, कारण विचार करायला वेळ लागतो अणि तोच तुमच्याकडे नव्हता. पूर्वी तुम्ही लॉक डाऊन मध्ये होता फक्त माहीत नव्हत.
                                 म्हणुन लॉक डाऊन च पालन करा, तुम्ही आम्ही कोणी बंदिस्त नाही, आज तुमच्याकडे वेळ, परिवार आहे, विरंगुळा म्हणुन कित्येक दिवस जंग पकडलेलि कला आहे. तिला घासून घासून कोरी करा, दुरावलेले नात जवळ आणा, एकमेकाच्या चेहर्‍याकडे रोज पाहणार्‍या कुटुंबात तुटलेला संवाधाचा पूल बांधून विचाराची देवाण-घेवाण करा, ज्ञानात पडलेला खंड भरून काढण्यासाठी पुस्तकाचे वाचन करा, सगळ्या परिवाराला वेळ देत नाही, याची असलेली खंत भरून काडा. प्रत्येकाने अस केल तर मला नाही वाटत की आपण लॉक डाऊन मध्ये अहो, अस कोणाला वाटेल म्हणुन, अणि आलेलं संकट कधी परतले हे कळणार नाही.
              शासनाला सहकार्य करा
               लॉक डाऊन च पालन करा 🙏🙏🙏
                                                                       

                                          लेखक - अविनाश वाघमारे

16 टिप्पण्या

  1. खरच खूप अप्रतिम लिहल आहेस मित्रा...अगदी मनातल बोलला...

    उत्तर द्याहटवा
  2. प्रत्युत्तरे
    1. अ + विनाश =अविनाश.... मित्रा या मानव जातीचा पृथ्वी वरून कधीच विनाश होणार नाही . तू या लेखातून लॉकडोवून या शब्दा ्चा गांभीर्याने पालन करण्याचा संदेश दिला तो एक अप्रतिम आहे .....खूप छान मित्रा

      हटवा
  3. अ + विनाश =अविनाश.... मित्रा या मानव जातीचा पृथ्वी वरून कधीच विनाश होणार नाही . तू या लेखातून लॉकडोवून या शब्दा ्चा गांभीर्याने पालन करण्याचा संदेश दिला तो एक अप्रतिम आहे .....खूप छान मित्रा

    उत्तर द्याहटवा
  4. अवि खरच खुप छान लिहले, प्रत्येकाच्या मनात हाच विचात आहे की आम्ही बंदिस्त अहो, पण या तुझ्या विषयानी खरच फरक पडेल. नान्हा प्रकारचे न्यूज पाहून व कुणाचं ऐकून पडलेला ग्यासमज दूर करणारा विषय आहे. खूप खूप अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  5. खूप छान लिहिलं आहेस अविनाश दादा...ह्या च सकारात्मक दृष्टीकोनाची सध्या गरज आहे जगाला आणि आपल्या भारताला...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने